उल्हासनगरात २४ हजाराचा गुटका जप्त

By सदानंद नाईक | Updated: July 5, 2024 19:43 IST2024-07-05T19:41:41+5:302024-07-05T19:43:24+5:30

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

gutka worth 24 thousand seized in ulhasnagar | उल्हासनगरात २४ हजाराचा गुटका जप्त

उल्हासनगरात २४ हजाराचा गुटका जप्त

सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-३, चोपडा कोर्ट येथील पाल पान शॉप दुकानातून २४ हजार रुपये किंमतीचा गुटका अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरवारी धाड टाकून पकडला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कृष्णशंकर सियाराम पाल याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, चोपडा कोर्ट परिसरात कृष्णशंकर पाल यांचे पाल पान सेंटर नावाचे पानांचे दुकान आहे. दुकानातून तंबाखूजन्य व आरोग्यास घातक असलेल्या गुटल्याची विक्री केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. अन्न सुरक्षा रक्षक अधिकारी राजेंद्र करडक यांच्या पथकाने गुरवारी पाल पान सेंटर दुकानावर धाड टाकून तंबाखूजन्य गुटका ताब्यात घेऊन जप्त केला. गुटख्याची किंमत २४ हजार ४४१ रुपये असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: gutka worth 24 thousand seized in ulhasnagar