शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

गुरुवर्य स. व. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:30 IST

ठाणे : नवोदितांनी खेळात परिश्रम व सातत्य ठेवावे, पूर्णतः सप्लिमेंट्सवर अवलंबून न राहता सुरुवातीला नैसर्गिकपणे सुदृढ शरीरयष्टी कमावण्याकडे भर ...

ठाणे : नवोदितांनी खेळात परिश्रम व सातत्य ठेवावे, पूर्णतः सप्लिमेंट्सवर अवलंबून न राहता सुरुवातीला नैसर्गिकपणे सुदृढ शरीरयष्टी कमावण्याकडे भर द्यावा, स्टेरॉइडयुक्त सप्लिमेंट्स टाळाव्यात, शासनमान्य फेडरेशनकडून खेळावे असा मौलिक सल्ला आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांनी दिला. बॉडीबिल्डिंग खेळाला ऑलिम्पिक पात्रता मिळाल्यास अनेक दृष्टीने नवोदितांना शासन साहाय्य मिळू शकेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित गुरुवर्य स.वि. कुलकर्णी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांच्या मुलाखतीने गुंफले. ठाणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोशिएशनचे सचिव यतीन टिपणीस यांनी मुलाखत घेतली. एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. तुषार चव्हाण यांनी निवेदन, तर प्राचार्य डॉ. हेमंत चित्ते यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सिद्धी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर व्याख्यानमालेच्या नियोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान, सहसचिव मानसी प्रधान, खजिनदार सतीश शेठ यांचे मार्गदर्शन लाभले. १४व्या वर्षापासूनच मी व्यायामावर भर दिला. घरात पोषक वातावरण असले तरीही या क्षेत्राकडे वळण्याची ओढ नव्हती. परंतु सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर व्यायामशाळेतील अंतर्गत स्पर्धेत भाग घेऊन उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आणि तिथेच शरीरसौष्ठव होण्याची आंतरिक प्रेरणा जागृत झाली. शाळेत असताना सायकलचे पंक्चर काढण्याचे दुकान सांभाळून शाळा आणि नियमितपणे व्यायाम अशी तारेवरची कसरत करावी लागायची. प्रत्येक महिन्यात जवळजवळ १५ स्पर्धांमध्ये मी सहभागी व्हायचो, अशा शब्दांत त्यांनी आपला प्रवास उलगडला. या सातत्यामुळेच त्यांनी ५००हून अधिक पारितोषिके पटकावली आहेत. २०१८ साली बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील मानाचे प्रो-कार्डही त्यांना प्राप्त झाले. उमेदीच्या काळात कोल्हापूरच्या कर्मयोगी विक्रमसिंह घाटगे यांनी आर्थिक मदत केली. अजित पवार, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे या सर्वपक्षीय नेत्यांनी वेळोवेळी मदत केल्यामुळेच मी इथवर पोहोचू शकलो, असे ते म्हणाले. या क्षेत्रातील नवोदितांना त्यांनी मार्गदर्शन केले.

--------------