शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

यंदाही गरबा खेळता येणार नाही; ठाणे महापालिकेने जारी केली मार्गदर्शक तत्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:32 IST

गणोशोत्सवाप्रमाणोच यंदाचा नवरात्रोत्सव देखील साध्या पध्दतीने साजरा करण्यात यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गणोशोत्सवाप्रमाणोच यंदाचा नवरात्रोत्सव देखील साध्या पध्दतीने साजरा करण्यात यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे. सार्वजनिक नवरात्नौत्सवासाठी उत्सव मंडळांना ठाणो महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यासाठीची ऑनलाईन परवानगी यंत्नणा कार्यान्वित करण्यात आली असून यावर्षी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी विनाशुल्क देण्यात येणार आहे. याशिवाय यंदा देखील सार्वजनिक ठिकाणी गरबा खेळता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाचा नवरात्नौत्सव साध्या पध्दतीने साजरा  करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यानुसार मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारण्यात यावेत. देवीमुर्तीची सजावट आटोपशीर असावी, तसेच देवीची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती मुर्तीकरिता २ फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीमूर्तीऐवजी घरातील धातू,संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, घरी विसर्जन करता येणो शक्य नसल्यास निजकच्या नैसर्गिक विसर्जनस्थळी विसर्जन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरगुती देवीमुर्तीचे आगमन व विसर्जन मिरवणूकीच्या स्वरु पाचे नसावे, आगमनासाठी जास्तीत जास्त ५ व्यक्तींचा समूह असावा. जे उपस्थित असतील ते मास्क, शिल्ड इत्यादी स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच शक्यतोवर या व्यक्तींनी कोरोना लसीकरणचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून १४ दिवस झालेले असावेत. सार्वजनिक देवीमूर्तीच्या आगमनाच्यावेळी व विसर्जनाच्यावेळी १० पेक्षा अधिक लोक असणार याची काळजी घ्यावी.

नवरात्नौत्सवादरम्यान गरब्याचे आयोजन केले जावू नये. तसेच आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्र म आयोजित करताना गर्दी होणार नाही व  कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन शिथिल करण्यासंबंधीच्या शासनाच्या प्रचिलत आदेशातील (ब्रेक द चेन) तरतुदींचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, यासोबतच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्याच्या सूचना महापालिकेच्यावतीने देण्यात आल्या आहेत. गरबा व इतर सांस्कृतिक कार्यक्र मांऐवजी आरोग्य विषयक उपक्र म राबवावे तसेच कोरोना, मलेरिया , डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. शक्यतो देवीमूर्तीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदीद्वारे उपलब्ध करु न देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवी मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्र ीनींगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा:या भाविकांसाठी सोशल डिस्टन्सींग  मास्कचा वापर, सॅनीटायझर आदी स्वच्छतेचे नियम पाळणो बंधनकारक राहणार आहे. मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसांतून तीन वेळा निर्जतुकीकरण करावे. तसेच कार्यकर्ते आणि इतर व्यक्ती यांना वापरासाठी सॅनिटायझर उपलब्ध करु न द्यावे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणो, फुले व हार अर्पण करणो आदी बाबींस शक्यतो आळा घालावा. नवरात्नौत्सव मंडपाच्या परिसरात तसेच त्या लगतच्या रस्त्यांवर फुले, हार, प्रसाद आदी विक्रीसाठी स्टॉल, दुकाने लावू नयेत.

देवीच्या आरतीच्या वेळी मंडपात दहा पेक्षा जास्त कार्यकर्ते / भाविक उपस्थित असू नयेत. विसर्जन मिरवणुक काढू नये, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिने विसर्जनस्थळी जाणो टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीमूर्तीचे एकित्रतरित्या विसर्जनास नेवून गर्दी करण्यास परवानगी असणार नाही. ठाणे महापालिकेच्यावतीने नैसर्गिक विसर्जन स्थळी प्रकाश योजना, जनरेटर, तात्पुरती स्वच्छतागृहे आदी आवश्यकतेनुसार दरवर्षी केली जाणारी व्यवस्था चोखपणो करण्यात येणार आहे. नवरात्नौत्सवाच्या विसर्जनाच्या तारखेस जर सार्वजनिक नवरात्नौत्सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्ये असेल तर त्या सार्वजनिक नवरात्नौत्सव मंडळास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्सम व्यवस्था करु न मुर्तीचे विसर्जन करणो बंधनकारक राहणार आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNavratriनवरात्री