शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीत गटप्रवर्तक, आशांचे रखडलेले पाच महिन्यांचे मानधन; काम बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST

ठाणे : राज्यात गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका मार्च २०२० पासून आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कोरोनाची कामे करत आहेत. तुटपुंज्या मानधनावर काम ...

ठाणे : राज्यात गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका मार्च २०२० पासून आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कोरोनाची कामे करत आहेत. तुटपुंज्या मानधनावर काम करत असतानाही त्यांना वेळेवर मानधन मिळत नसल्याचा आरोप होत आहे. सध्या पाच महिन्यांचे मानधन रखडल्यामुळे त्यांच्या कुटुंबांची उपासमार सुरू आहे. सणासुदीचा कालावधी लक्षात घेऊनही मानधन दिले नाही. आठ दिवसांत मानधन, कोरोना भत्ता, इतर देय मिळालेच पाहिजे, अन्यथा काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी रविवारी दिला.

जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा देणाऱ्या गटप्रवर्तक व अशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोना काळात स्वतःसह कुटुंबांचा जीव धोक्यात घालून त्या काम करत आहेत. मात्र काम करूनही शासन प्रशासन पैसे देत नसल्याने त्यांच्यात सरकारबद्दल असंतोष खदखदत आहे, असे महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे उपाध्यक्ष भगवान दवणे यांनी सांगितले.

या आर्थिक विवंचनेतून सुटका होण्यासाठी राज्यातील गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविकांनी जूनमध्ये संपही केला होता. दरम्यान सरकारने गटप्रवर्तकांना एक हजार २०० व कोरोना भत्ता ५०० असे एक हजार ७०० रूपये गटप्रवर्तकांना घोषीत केले आहेत. आशा स्वयंसेविकांना एक हजार रूपये व कोरोना भत्ता ५०० रुपये आदी एक हजार ५०० रुपये वाढ झाली आहे. यास मंत्रिमंडळाने मान्यताही दिली आहे. मात्र शासन आदेश अद्याप काढला नाही. तो ताबडतोब काढण्यात यावा व राज्य सरकारने पाच महिन्यांची थकबाकी व जुलैपासूनचा फरक ताबडतोब द्यावा. केन्द्र सरकारचा बंद केलेला प्रोत्साहन भत्ता सुरू करावा आदी मागण्या केल्या जात आहेत.