शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

पूरग्रस्त कुटुंबीयांना मिळणार भरीव मदत : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 23:37 IST

देवेंद्र फडणवीस : २00५ पेक्षाही जास्त मदत करणार

बदलापूर : शिवसेना आणि भाजपची सत्ता म्हणजे रयतेची सत्ता आहे. शिवरायांना अभिप्रेत असलेली कामे आमचे सरकार करत आहे. सरकारचे सर्व निर्णय जनहितासाठीच घेतले जात आहेत. महापुरात बाधित झालेल्या प्रत्येक कुटुंबाचा संसार उभा करण्यासाठी भरीव मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले.

मुरबाड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, नवे पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीचे उद्घाटन, मुरबाड बसआगार, धान्यसाठवणगृह आणि म्हसा महाविद्यालयाचे भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमांचा मोठा सोहळा मुरबाडमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस यांनी २७ जुलैच्या महापुरात ठाणे जिल्ह्यासह बदलापुरातील बाधित कुटुंबीयांना भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. २००५ च्या महापुरात जी मदत करण्यात आली होती, त्यापेक्षा जास्त मदत कशी करता येईल, याचा निर्णय शासन घेणार आहे. त्यासाठी स्वतंत्र आदेशदेखील काढले जातील, असे ते म्हणाले. पूरपरिस्थितीत नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी शासनस्तरावर आम्ही घेतलेले निर्णय हे योग्य ठरले आहेत. पुरात कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची काळजी सरकारने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुरबाडमधील विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले की, शिवाजी महाराजांचा पुतळा हा ऊर्जा देणारा आहे. केवळ पूजा करण्यापेक्षा नागरिकांनी छत्रपतींना अभिप्रेत असलेले राज्य निर्माण करण्यासाठी हातभार लावण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच पोलीस स्टेशन असल्याने पोलीसही आता यातून ऊर्जा घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुरबाड मतदारसंघात काम करताना याठिकाणी नागरिकांना काय हवे आहे, याची कल्पना आमदार कथोरे यांना आहे. त्यामुळे ते शासनाकडे पाठपुरावा करताना तशा पद्धतीनेच मागणी करतात. त्यामुळे त्यांची मागणी शासन नाकारत नसून, त्यामुळे मुरबाड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. एमएमआरडीए क्षेत्रात मुरबाडचाही समावेश केल्याने आता मुरबाडला दुहेरी मदत होणार आहे. पूर्वीचे सरकार एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात केवळ ५०० ते ६०० कोटींची कामे करत होते. मात्र, विद्यमान सरकारच्या काळात एकाच विधानसभा मतदारसंघात ५०० कोटींपेक्षा जास्तीची कामे होतात. एमएमआरडीएचा लाभ खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याला झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.च्मुरबाडच्या शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याची उंची चौथºयासह ३० फूट असल्याने या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी मागवण्यात आली होती. उंच शिडीच्या या गाडीच्या मदतीने मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याला हार अर्पण केला.च्मुरबाडमध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे उद्घाटन करत असताना मुख्यमंत्र्यांनी या कामाचे कौतुक केले. खाजगी गृहसंकुलाप्रमाणे पोलीस वसाहत आणि पोलीस स्टेशन उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfloodपूरbadlapurबदलापूर