शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि नाण्यांचे भव्य प्रदर्शन, विद्यार्थ्यांची अलोट गर्दी

By सदानंद नाईक | Updated: March 21, 2026 17:21 IST

Ulhasnagar News: शिंदेसेना शहर शाखेच्या वतीने विठ्ठलवाडी येथील वेदांत महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवसीय ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा आणि स्वराज्य स्थापनेची गाथा उलगडणाऱ्या या प्रदर्शनाला नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

- सदानंद नाईक उल्हासनगर -  शिंदेसेना शहर शाखेच्या वतीने विठ्ठलवाडी येथील वेदांत महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवसीय ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा आणि स्वराज्य स्थापनेची गाथा उलगडणाऱ्या या प्रदर्शनाला नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

उल्हासनगर शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या संकल्पनेतुन वेदांत महाविद्यालय प्रांगणात २० ते २१ मार्च दरम्यान शिवकालीन शस्त्रे, प्राचीन नाणी आणि गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृतीचे प्रदर्शन भरविण्यात आले. शिवकालीन युद्धकौशल्य, किल्ल्यांची रचना आणि तत्कालीन चलन व्यवस्था याबद्दल सविस्तर माहिती दिली जात आहे. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, माजी आमदार पप्पू कलानी, शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी गटनेते अरुण आशान व इतर मान्यवरही उपस्थित होते.

 शिवकालीन इतिहासिक ठेवा नवीन पिढीला आपला देदिप्यमान इतिहास केवळ पुस्तकातून न वाचता प्रत्यक्ष पाहता यावा आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी, हाच या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. (गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख)

 शिंदेसेना महानगरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमामुळे शहरातील शालेय विद्यार्थ्यांना शिवरायांच्या काळातील शस्त्रे आणि संस्कृती जवळून अनुभवण्याची संधी मिळाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आणि शिवप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shivaji Era Arms, Coins Exhibition Draws Huge Student Crowd in Ulhasnagar

Web Summary : Ulhasnagar hosts a three-day exhibition of Shivaji Maharaj's era arms, ancient coins, and fort replicas. Organized by Shinde Sena, the event at Vedant College aims to inspire the younger generation with Maratha history. Students enthusiastically explore exhibits showcasing warfare, fort architecture, and currency.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणेStudentविद्यार्थी