उल्हासनगरात शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि नाण्यांचे भव्य प्रदर्शन, विद्यार्थ्यांची अलोट गर्दी

By सदानंद नाईक | Updated: March 21, 2026 17:21 IST2026-03-21T17:21:11+5:302026-03-21T17:21:48+5:30

Ulhasnagar News: शिंदेसेना शहर शाखेच्या वतीने विठ्ठलवाडी येथील वेदांत महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवसीय ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा आणि स्वराज्य स्थापनेची गाथा उलगडणाऱ्या या प्रदर्शनाला नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

Grand exhibition of Shiva era weapons and coins in Ulhasnagar, huge crowd of students | उल्हासनगरात शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि नाण्यांचे भव्य प्रदर्शन, विद्यार्थ्यांची अलोट गर्दी

उल्हासनगरात शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि नाण्यांचे भव्य प्रदर्शन, विद्यार्थ्यांची अलोट गर्दी

- सदानंद नाईक 
उल्हासनगर -  शिंदेसेना शहर शाखेच्या वतीने विठ्ठलवाडी येथील वेदांत महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवसीय ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा आणि स्वराज्य स्थापनेची गाथा उलगडणाऱ्या या प्रदर्शनाला नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

उल्हासनगर शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या संकल्पनेतुन वेदांत महाविद्यालय प्रांगणात २० ते २१ मार्च दरम्यान शिवकालीन शस्त्रे, प्राचीन नाणी आणि गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृतीचे प्रदर्शन भरविण्यात आले. शिवकालीन युद्धकौशल्य, किल्ल्यांची रचना आणि तत्कालीन चलन व्यवस्था याबद्दल सविस्तर माहिती दिली जात आहे. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, माजी आमदार पप्पू कलानी, शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी गटनेते अरुण आशान व इतर मान्यवरही उपस्थित होते.

 शिवकालीन इतिहासिक ठेवा
 नवीन पिढीला आपला देदिप्यमान इतिहास केवळ पुस्तकातून न वाचता प्रत्यक्ष पाहता यावा आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी, हाच या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. (गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख)

 शिंदेसेना महानगरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमामुळे शहरातील शालेय विद्यार्थ्यांना शिवरायांच्या काळातील शस्त्रे आणि संस्कृती जवळून अनुभवण्याची संधी मिळाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आणि शिवप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title : उल्हासनगर में शिवाजीकालीन शस्त्रों, सिक्कों की प्रदर्शनी में छात्रों की भारी भीड़

Web Summary : उल्हासनगर में शिंदे सेना द्वारा आयोजित शिवाजी महाराज के समय के शस्त्रों, प्राचीन सिक्कों और किले की प्रतिकृतियों की तीन दिवसीय प्रदर्शनी लगी। वेदांत कॉलेज में आयोजित इस कार्यक्रम का उद्देश्य युवा पीढ़ी को मराठा इतिहास से प्रेरित करना है। छात्र उत्साहपूर्वक युद्ध, किले की वास्तुकला और मुद्रा को दर्शाते प्रदर्शनों का पता लगाते हैं।

Web Title : Shivaji Era Arms, Coins Exhibition Draws Huge Student Crowd in Ulhasnagar

Web Summary : Ulhasnagar hosts a three-day exhibition of Shivaji Maharaj's era arms, ancient coins, and fort replicas. Organized by Shinde Sena, the event at Vedant College aims to inspire the younger generation with Maratha history. Students enthusiastically explore exhibits showcasing warfare, fort architecture, and currency.