जि. प. अधिकाऱ्यांनी एकही पैसा खर्च न करता अडवलं पाणी; 1500 वनराई बंधाऱ्यांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:27 AM2019-12-30T00:27:42+5:302019-12-30T00:27:44+5:30

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला

GP Resolution to congratulate the officers | जि. प. अधिकाऱ्यांनी एकही पैसा खर्च न करता अडवलं पाणी; 1500 वनराई बंधाऱ्यांची उभारणी

जि. प. अधिकाऱ्यांनी एकही पैसा खर्च न करता अडवलं पाणी; 1500 वनराई बंधाऱ्यांची उभारणी

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यात आतापर्यंत लोकसहभागातून सुमारे १५०० वनराई बंधारे बांधल्याबद्दल व आगामी काळात उर्वरित ठिकाणी नदी, नाले, ओहोळ यावर वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला आहे.

जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधले आहेत. एक पैसाही खर्च न करता लोकसहभागातून या वनराई बंधाºयांची कामे सीईओ यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे, ग्रामपंचायतींचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी पूर्ण केली.

जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आपल्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रमदानातून वनराई बंधारे बांधत आहेत. ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी व गावकºयांनी त्यात हिरिरीने सहभाग घेतला. जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याची लोकचळवळ सुरू झाली आहे.
या यशस्वी उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत सदस्य सुभाष घरत यांनी अधिकाºयांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला असता त्यास सर्वांनी सहमती दर्शविली. वनराई बंधारे उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अधिकाºयांचे कौतुक होत आहे.

गावखेड्यांतील पाणीटंचाई होणार दूर; रब्बी हंगामालाही लागणार हातभार
वनराई बंधाºयांमध्ये अडवण्यात आलेल्या पाण्याचा वापर रब्बी व पालेभाज्याचे पीक घेण्यासाठी होऊ शकतो. याशिवाय, विहिरीतील पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यास व पाणी टिकवून ठेवण्यास मदत होत आहे.
जंगलातील माळरानावरील पशुपक्षी, गायी, म्हशी आदी जनावरांच्या पाण्यासाठी या बंधाºयांचा उपयोग होत आहे. गावखेड्यांची संभाव्य पाणीटंचाई टाळण्याकरिता त्याचा उपयोग होणार आहे.
वाहून जाणाºया पाण्याचा वनराई बंधाºयांमुळे वापर करणे सहज शक्य झाले आहे. यासाठी सिमेंटच्या रिकाम्या गोण्या महापालिका, बांधकाम विभाग, एमएमआरडीए आदींकडून मोफत मिळवलेल्या आहेत.

Web Title: GP Resolution to congratulate the officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.