शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

मुख्यमंत्र्यांचे जय राजस्थान ; राजस्थानी समाजासाठी शासकीय भूखंड देण्याची होळी संमेलनात ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2018 12:58 PM

राजस्थानवासीयांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याची जाहीर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भार्इंदर येथील राजस्थान वासियांच्या होळी महासंमेलन कार्यक्रमात दिली

मीरारोड - राजस्थानवासीयांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याची जाहीर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भार्इंदर येथील राजस्थान वासियांच्या होळी महासंमेलन कार्यक्रमात दिली.  इंद्रलोक येथील स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानात राजस्थानी छत्तीस कौम एकता परिषद, जालोर-सिरोही विकास परिषद, राजस्थानी मेवाड प्रवासी संघ, ३६ कौम एकता मंडळ, पाली जिल्हा प्रवासी संघ, सिरोही -जालोर प्रवासी संघ यांनी संयुक्त पणे राजस्थानी होळी महासंमेलनाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी केले होते.महापालिकेच्या सभागृह, मंडईच्या इमारतींचे उद्घाटन आटपून मुख्यमंत्री होळी महासंमेलनात आले. वास्तविक राजस्थानी होळी कार्यक्रमासाठी ते आवर्जून भार्इंदरमध्ये आले होते. तशी जाहीर कबुलीच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली. त्यांचा खास राजस्थानी साफा घालून सत्कार करण्यात आला. महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, सभागृह नेते रोहिदास पाटील, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, नागोबा फौंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, शहरप्रमुख धनेश पाटील, संमेलनाचे आयोजक अध्यक्ष गोविंद राजपुरोहित, रतनसिंह राठोड, प्रताप पुरोहित आदी उपस्थित होते. या वेळी मोठ्या संख्येने राजस्थानी समाज बांधव उपस्थित होते.मीरा भार्इंदर हे मीनी राजस्थान असून राजस्थानी समाजाने नेहमीच देण्याचे काम केले आहे असे आमदार मेहता म्हणाले. राजस्थानी जेवढे येतील तेवढी माहाराष्ट्राची भूमी गोड होत जाईल असं स्व. गोपीनाथ मुंडे म्हणायचे अशी आठवण त्यांनी सांगितली. पालिकेने महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचा ठराव केला आहे. त्याची मंजुरी शासनाकडून येत्या जयंती आधी मिळेल अशी आशा व्यक्त केली. शासनाने राजस्थानी समाजासाठी सरकारी भूखंड द्यावा अशी मागणी  मेहतांनी या वेळी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरुवातच आपल्या समोर संपूर्ण राजस्थान दिसत आहे अशी केली. मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या वेळी आलो असता गोविंद पुरोहित आदिंशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी आम्ही सर्व भाजपालाच निवडून देणार असे सांगितले होते. पण पालिका जिंकून दिल्यावर मात्र तुम्हाला होळीच्या कार्यक्रमाला यावे लागेल अशी अट पण टाकली होती. त्यानुसार आपण राजस्थानी होळी संमेलनास आल्याचे मुख्यमंत्री आवर्जून म्हणाले.होळीच्या शुभेच्छा देतानाच होळी हा सामाजिक सलोख्याचा सण आहे. त्याच सोबत पर्यावरणाला वाचवण्यासाठी झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. होळी साठी झाडं न तोडता कचरा, सुकी पानं - गवत आदींचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं . राजस्थानी समाजाने आपल्याला खूप प्रेम दिलं आहे. तुम्हाला गरज असेल तेव्हा सांगा, अर्ध्यारात्री येऊ. वर्षा हे तुमचंच घर आहे असं ते म्हणाले.राजस्थानमधून येणारे प्रवासी असतील, उपचारासाठी येणारे लोक असतील त्यांच्यासाठी जागा हवी. समाजाने भूखंडाची मागणी केली असून नरेंद्र मेहता यांनी जागा शोधून द्यावी. ती जागा मंजूर करण्याचे काम शासन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर जय राजस्थान म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा