ठाण्यासह चार जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुंडास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 00:14 IST2021-12-23T00:09:43+5:302021-12-23T00:14:49+5:30
ठाण्यासह चार जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या शाम ऊर्फ वीरू अशोक रेवणकर (३२, रा. दौलतनगर, कोपरी, ठाणे) याला कोपरी पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली.

ठाण्यासह चार जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुंडास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यासह चार जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या शाम ऊर्फ वीरू अशोक रेवणकर (३२, रा. दौलतनगर, कोपरी, ठाणे) याला कोपरी पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम १४२ अन्वये कारवाई केली आहे.
वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने ७ जुलै २०२१ रोजी रेवणकर याला एक वर्षाच्या कालावधीसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यामधून हद्दपार केले होते. तरीही तो विनापरवानगी कोपरी परिसरात फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूझा यांना मिळाली होती. त्याआधारे डिसूझा आणि निरीक्षक दीपक फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनीष पठाणे यांच्या पथकाने त्याला २१ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अटक केली.