गुडविन फसवणूक प्रकरण: अकराकरण बंधूंची केरळमध्ये ५० कोटींची मालमत्ता

By जितेंद्र कालेकर | Published: December 16, 2019 12:15 AM2019-12-16T00:15:00+5:302019-12-16T00:15:02+5:30

गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण यांच्या सुमारे ५० कोटींच्या २१ मालमत्ता केरळसह इतर ठिकाणी आढळल्या आहेत. त्यातील बहुतांश मालमत्ता जप्त केल्या असून वर्षभरात या मालमत्तांच्या लिलावातून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे न्यायालयाच्या मार्फतीने परत करता येऊ शकतील, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

Goodwin Fraud Case: Akrakaran brothers have assets worth Rs 50 crore in Kerala | गुडविन फसवणूक प्रकरण: अकराकरण बंधूंची केरळमध्ये ५० कोटींची मालमत्ता

दिड कोटींची रोकड असलेली बँक खाती गोठवली

googlenewsNext
ठळक मुद्देदोन मर्सिडीजसह १० वाहने, मॉल, बंगल्यांसह ९० एकरची जमीनदिड कोटींची रोकड असलेली बँक खाती गोठवली

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ भागांतील सुमारे १२०० गुंतवणूकदारांची २५ कोटींची फसवणूक करणा-या ‘गुडविन ज्वेलर्स’च्या सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोन्ही बंधूंची केरळसह इतर ठिकाणी सुमारे ५० कोटींच्या २१ मालमत्ता आढळल्या आहेत. त्यातील बहुतांश मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून वर्षभरात या मालमत्तांच्या लिलावातून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करता येऊ शकतील, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस उपायुक्त संजय जाधव आणि सहायक आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव, नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, शंकर चिंदरकर आणि वनीता पाटील आदींचा समावेश होता. महाराष्टÑात शेकडो लोकांच्या फसवणुकीनंतर अकराकरण बंधूंनी केरळातील त्रिशूर जिल्ह्यात जमीन आणि स्थावर मालमत्ताखरेदीमध्ये मोठी गुंतवणूक केली. केरळमध्येच त्यांची एक तीन मजली इमारत आहे. याशिवाय, आलिशान मॉल, सुमारे ९० एकर जमीन, बंगले, रिसॉर्ट अशा एकापेक्षा एक ४० ते ५० कोटींच्या २१ मालमत्ता आढळल्या आहेत. यातील अनेक मालमत्तांची त्यांच्याच नातेवाइकांच्या मदतीने खातरजमा केल्यानंतर त्या सीलबंद केल्या आहेत. दोन महागड्या मर्सिडीज मोटारकारसह फॉर्च्युनर, इनोव्हा अशा दीड ते दोन कोटींच्या १० मोटार कारचाही त्यामध्ये समावेश आहे. बँकेतही सुमारे दीड कोटींची रक्कम आढळली असून ती खातीही गोठविण्यात आली आहेत. ठाण्यातील नौपाडा, डोंबिवलीतील मानपाडा आणि अंबरनाथमधील शिवाजीनगर या तीन पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत ११५४ गुंतवणूकदारांची त्यांनी २५ कोटींची फसवणूक केल्याचे आढळले आहे. मात्र, राज्यातील पालघर, नवी मुंबई, पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि ठाणे ग्रामीण अशा विविध ठिकाणीही या ज्वेलर्सने तीन ते चार हजार गुंतवणूकदारांची ९० कोटींपेक्षा अधिक फसवणूक केल्याचे आढळले आहे. सुरुवातीला ठाणे पोलिसांना त्यांची २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. परंतु, त्यांच्या मालमत्तांची तसेच यातील आणखी फरारी आरोपींची माहिती मिळविण्यासाठी अकराकरण बंधूंच्या पोलीस कोठडीमध्ये आणखी वाढ करण्यासाठी ठाणे न्यायालयाकडे आर्थिक गुन्हे शाखेकडून मागणी केली जाणार आहे. ती मिळाल्यानंतर इतरही जिल्ह्यातील पोलीस त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Goodwin Fraud Case: Akrakaran brothers have assets worth Rs 50 crore in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.