चुकीचा सिग्नल दिल्याने बदलापूर स्टेशनजवळ मालगाडी अडकली; कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प
By पंकज पाटील | Updated: July 31, 2024 18:14 IST2024-07-31T17:54:22+5:302024-07-31T18:14:39+5:30
Mumbai Suburban Railway News: मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ अडकल्याने अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा खंडित झाली होती. सायंकाळी चार वाजून 45 मिनिटाच्या दरम्यान ही घटना घडली.

चुकीचा सिग्नल दिल्याने बदलापूर स्टेशनजवळ मालगाडी अडकली; कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प
- पंकज पाटील
बदलापूर - मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ अडकल्याने अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा खंडित झाली होती. सायंकाळी चार वाजून 45 मिनिटाच्या दरम्यान ही घटना घडली.
सायंकाळी पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी बदलापूर स्थानकाजवळ आलेली असताना ही गाडी फलाट क्रमांक दोन वरून पास होणे अपेक्षित होते मात्र मालगाडीचे इंजिन हे दोन नंबर प्लॅटफॉर्मच्या रुळावर न जाता ती थेट होम प्लॅटफॉर्मच्या दिशेने गेल्याने मोटर म्हणणे लागलीच गाडी थांबवत याची कल्पना स्टेशन प्रबंधकांना दिले होम प्लॅटफॉर्म आणि फलट क्रमांक दोन या दोन्ही रेल्वे रुळांवर ही मालगाडी अडकून पडल्यामुळे कर्जत दिशेकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.