गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:47 AM2021-03-01T04:47:25+5:302021-03-01T04:47:25+5:30

ठाणे : शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर शनिवारी झालेल्या तिसऱ्या जी. के. फणसे स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गोल्डन स्टार ...

Golden Star Cricket Academy unbeaten | गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी अजिंक्य

गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी अजिंक्य

Next

ठाणे : शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर शनिवारी झालेल्या तिसऱ्या जी. के. फणसे स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमीने बॉय क्रिकेट अकॅडमीचा निम्मा संघ राखून पराभव केला.

१९ वर्षांखालील वयोगटासाठी झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात बॉय क्रिकेट अकॅडमीची १४९ धावसंख्या ‘गोल्डन स्टार’ने पाच विकेट्सच्या मोबदल्यात पार केली. सामनावीर कर्णधार आशुतोष माळी याने ७९ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा पटकावल्या. कसोटीपटू निलेश कुलकर्णी, रणजीपटू संदीप दहाड, संजय नाईक, जगदीश आचरेकर, नदीम मेमन, कौशिक गोडबोले, दीपक पाटील, श्रीकांत खारगे, अभय हडप आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. आयोजक अतुल फणसे यांनी प्रास्ताविक केले, तर उदय राजे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Golden Star Cricket Academy unbeaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.