शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गोल्डन डाइज येथील ध्वज झाला गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:53 IST

शहराच्या सांस्कृतिक आणि राष्टÑाभिमान या परंपरांमध्ये भर पडावी, म्हणून महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच गोल्डन डाइजजवळ तब्बल ३०.५ मी लांबीचा फ्लॅग मास्ट उभारला होता.

ठाणे : शहराच्या सांस्कृतिक आणि राष्टÑाभिमान या परंपरांमध्ये भर पडावी, म्हणून महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच गोल्डन डाइजजवळ तब्बल ३०.५ मी लांबीचा फ्लॅग मास्ट उभारला होता. त्याचा मोठा दिमाखदार सोहळादेखील पार पडला होता. परंतु, अवघ्या आठवडाभरात या मास्टवरील फ्लॅगच गायब झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत, पालिकेला विचारले असता फ्लॅग फाटल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ परंपरा जपण्याच्या नादात पालिकेने हे प्रकरण गरज नसतानादेखील ५ (२) (२) खाली मंजूर करून त्यावर सुमारे २५ लाखांचा खर्च केला होता. परंतु, आता दीड महिन्यापासून फ्लॅगच फडकत नसल्याने केलेल्या खर्चाबाबत शंका उपस्थित केल्या आहेत.ठाणे महापालिकेने गोल्डन डाइजनाका येथे राष्टÑीय ध्वज उभारण्याचे ठरवले होते. त्यानुसार, मे महिन्यात यासंदर्भातील प्रस्ताव ५ (२) (२) खाली मंजूर करून घेतला. या कामात डी.के. फ्लॅग फाउंडेशनमार्फत एक राष्टÑीय ध्वज, नामफलक, सिंहाचे चार पुतळे व पोडियमचे डिझाइन या बाबी विनामूल्य व ३०.५ मी लांबीचा फ्लॅग मास्ट खालीवर करण्याच्या अ‍ॅक्सेसरीजसह अँकर बोल्ट, पी.यू. पेन्टेड पोल्स आदी बाबी महापालिकेच्या आर्थिक तरतुदीतून पुरवल्या. तसेच या ठिकाणी ध्वज पोडियम, पायºया, अंतर्गत पाथवेज, विद्युत कामे करण्याचा खर्चदेखील यात अंतर्भूत करण्यात आला. त्यानुसार, या कामावर २४ लाख ९८ हजार ५५० रुपये खर्च केला. हे काम करून शहराच्या दृष्टीने आणखी एक मानाचा तुरा पालिकेने खोवल्याचे बोलले जात होते. ठाणेकरांनाही या झेंड्याकडे पाहून अभिमान वाटत होता. परंतु, अवघ्या आठच दिवसांत हा झेंडा गायब झाला आहे.यासंदर्भात पालिकेच्या अधिकाºयांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ध्वज फाटला आहे. परंतु, नवा ध्वज केव्हा लागेल, याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. आज दीड महिना उलटूनही तो लागलेला नाही. त्यात, आता या कामाबाबतदेखील शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. हे काम इतके गरजेचे होते का, ते ५ (२) (२) खाली करण्याची गरज होती का, असे सवालही आता उपस्थित झाले आहे.