लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पाचपाखाडी येथील एका महिलेचे चार तोळयांचे एक लाख ९४ हजार ७५० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाºया प्रमोद नचकू सिंग (४५, रा. चंदनवाडी, ठाणे) या आरोपीला नौपाडा पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील सर्वच ऐवज हस्तगत केला आहे.पाचपाखाडी येथे १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही महिला एका रिक्षाने आली होती. ती तिथे उतरल्यानंतर प्रमोद याने तिच्या बॅगमधून चार तोळयांचे दागिने चोरले होते. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद लभडे , जमादार सुनिल अहिरे, पोलीस नाईक संजय चव्हाण, साहेबराव पाटील आणि कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे सिंग याला अवघ्या सहा तासांमध्ये ताब्यात घेतले. नितीन नाका येथे त्याची पान टपरी असून टपरी चालविण्याबरोबरच त्याने चोरीही केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
सोन्याचे दागिने चोरणाऱ्यास अवघ्या सहा तासांमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 00:15 IST
एका महिलेचे चार तोळयांचे सोन्याचे दागिने चोरणाºया प्रमोद सिंग (४५) या आरोपीला नौपाडा पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये मंगळवारी अटक केली.
सोन्याचे दागिने चोरणाऱ्यास अवघ्या सहा तासांमध्ये अटक
ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कामगिरी एक लाख ९४ हजारांचे दागिने हस्तगत