शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:26 IST

Thane Mumbra Train Accident: मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान सोमवारी दुर्दैवी अपघात घडला. यात काही जण मृत्यूमुखी पडले. या घटनेनंतर काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या केंद्र सरकारवर संतापल्या. 

Mumbra Train Accident Today in Marathi: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे मार्गावर दुर्दैवी घटना घडली. गर्दीमुळे दारात लटकून प्रवास करत असलेले काही प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ खाली पडले. यात काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलताना काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड केंद्र सरकारवर भडकल्या. मुंबईत नोकरी करायाला जाणे म्हणजे जीवासोबत खेळण्यासारखे झाले आहे, असे त्या म्हणाल्या. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंब्रातील लोकल रेल्वे घटनेबद्दल वर्षा गायकवाड म्हणाल्या, "आम्ही संसदेत वारंवार सांगितले की, रोज जवळपास ७ लोकांचा मुंबई लोकलमधून पडून मृत्यू होत आहे. आज भरलेल्या कसारा लोकल ट्रेनमधून पडून ५ लोकांचा मृत्यू झाला. तर इतर जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयाप्रती सहवेदना व्यक्त करते."

सरकार गंभीर दिसत नाहीये

वर्षा गायकवाड यांनी पुढे म्हटले आहे की, "मुंबईत नोकरी करायला जाणे आता जीवाशी खेळण्यासारखे बनले आहे. आम्ही वारंवार संसदेत मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये वाढत्या अपघातांचा मांडला. पण, या विषयावर सरकार गंभीर दिसत नाहीये."

वाचा >>ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू

"आयुष्यभर कष्ट उपसणाऱ्या मुंबईकरांच्या जीवाची काही किंमत नाहीये का? सातत्याने सातत्याने अपघात होत असूनही रेल्वे मंत्री रील मंत्री बनले आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी माझी मागणी आहे", असे खासदार गायकवाड म्हणाल्या. 

"रेल्वे प्रशासनाने उपनगरीय रेल्वे सेवेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमी जितकी शक्य आहे, तितकी तात्काळ केली जावी. मुंबईच्या लाइफलाइनला डेथ लाइन बनवणाऱ्या या सरकारची जितकी निंदा करावी तितकी कमीच आहे", अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली. 

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलAccidentअपघातVarsha Gaikwadवर्षा गायकवाडDeathमृत्यूIndian Railwayभारतीय रेल्वे