"वडिलांना आयसीयूमध्ये अॅडमिट करण्यासाठी तरूणाकडून दीड लाख रुपये घेतले"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 15:19 IST2021-04-22T15:18:18+5:302021-04-22T15:19:56+5:30
Thane : आयसीयूमध्ये वडिलांना अॅडमिट करण्यासाठी तरुणाकडून दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे.

"वडिलांना आयसीयूमध्ये अॅडमिट करण्यासाठी तरूणाकडून दीड लाख रुपये घेतले"
ठाणे : ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयात आयसीयूमध्ये वडिलांना अॅडमिट करण्यासाठी प्रवीण बाबर या तरुणाकडून दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत तरुणासोबत संभाषण केल्याची ऑडिओ क्लिप मनसे नेते अविनाश जाधव यांनी मीडियाला दिली आहे.
याचबरोबर, अविनाश जाधव यांनी याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त हणेश देशमुख यांची भेट घेऊन यां घडलेला प्रकार सांगितला. यानंतर अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि पैसे घेताना कोणी आढळून आले तर संबंधितांवर आजच गुन्हा दाखल होईल, असे हणेश देशमुख यांनी सांगितले आहे.
ठाणे : वडिलांना आयसीयूमध्ये ऍडमिट करण्यासाठी प्रवीण बाबर या तरुणाकडून दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे. @mnsadhikrut#coronavirus@rajeshtope11@CMOMaharashtra@OfficeofUT@RajThackeraypic.twitter.com/LC6TAcB3Bn
— Lokmat (@MiLOKMAT) April 22, 2021