सायकल स्पर्धेत गीतांजली गायकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:25 IST2018-08-25T00:25:23+5:302018-08-25T00:25:47+5:30

अंबरनाथ नगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या पुढाकाराने शुक्रवारी झालेल्या सायकल स्पर्धेत अंबरनाथच्या गीतांजली गायकर या तरूणीने प्रथम क्रमांक पटकावला

Gitanjali Gayar won the cycle competition | सायकल स्पर्धेत गीतांजली गायकर विजयी

सायकल स्पर्धेत गीतांजली गायकर विजयी

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या पुढाकाराने शुक्रवारी झालेल्या सायकल स्पर्धेत अंबरनाथच्या गीतांजली गायकर या तरूणीने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ३८७ स्पर्धक सहभागी झाले होते.
अंबरनाथ नगरपालिका आणि महिला बालकल्याण समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सायकल स्पर्धेत अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. बी केबिन रोड राहुलनगर ते मोरोली पाडा आणि परत अशी स्पर्धा झाली. स्पर्धेचे उदघाटन नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या हस्ते झाले. शहरातील १४ वर्षांखालील मुले, मुली, १७ वर्षांखालील मुली तसेच महिलांच्या खुल्या गटात स्पर्धा झाली. ठाणे जिल्हा सायकल संघटनेच्यावतीने स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात (मुले) शाहिद शेख , साक्षी भालेराव (मुली) हे विजयी झाले. तर १७ वर्षाखालील गटात जुई सावंत विजयी झाली. तर महिलांसाठी खुला गटात गीतांजली गायकर, लुपता किरांगे, देवयानी मोहपे यांनी अनुक्र मे प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. तर डॉ. संगीता कंदोई, वैशाली कुमावत, भैरवी जंगम, ज्योत्स्ना डोंगरे यांनी उत्तेजनार्थ क्र मांक मिळवला. शिवाजी चौकात पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Gitanjali Gayar won the cycle competition

टॅग्स :thaneठाणे