16 वर्षांपूर्वी अपहरण केलेल्या मुलीला देहव्यापार व्यवसायात ढकलणा-या महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:37 IST2017-09-12T14:37:54+5:302017-09-12T14:37:54+5:30
एका मुलीला देहव्यापार व्यवसायात ढकलणा-या 44 वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेनं या पीडित मुलीचं 16 वर्षांपूर्वी अपहरण केले होते. मीरा रोड येथील ही घटना आहे.

16 वर्षांपूर्वी अपहरण केलेल्या मुलीला देहव्यापार व्यवसायात ढकलणा-या महिलेला अटक
ठाणे, दि. 12 - एका मुलीला देहव्यापार व्यवसायात ढकलणा-या 44 वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेनं या पीडित मुलीचं 16 वर्षांपूर्वी अपहरण केले होते. यानंतर तिनं या मुलीला देहव्यापार व्यवसायात ढकलण्याचा आरोप अटक करण्यात आलेल्या 44 वर्षीय महिलेवर करण्यात आला आहे. काशीमीरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सानप यांनी सांगितले की, जिल्हा ग्रामीण पोलीसच्या मानव तस्करीविरोधी सेलनं जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातील एका घरावर रविवारी छापा मारला.
यावेळी एक खोलीमध्ये त्यांना एक मुली व दोन पुरुष आढळून आले. पोलिसांनी पुढे असेही सांगितले की, यावेळी त्या घरात असणा-या हजर असलेल्या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस चौकशीदरम्यान, महिलेनं सर्व बाबींचा खुलासा करत सांगितले की जवळपास 16 वर्षांपूर्वी मुंबईतील एका हॉस्पिटलमधून मुलीचं अपहरण केले होते, जेथे मुलीचा जन्म झआला होता. यानंतर मुलीला घेऊन ती मीरा रोड परिसरातील घरी गेली. आरोपी महिलेनं शेजा-यांना ही मुलगी स्वतःची असल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सानप यांनी सांगितले की, महिलेनं काही काळापर्यंत मुलीला शाळेत पाठवले आणि त्यानंतर देहव्यापार व्यवसायात तिला ढकललं.
दरम्यान, याप्रकरणी आरोपी महिलेला रविवारी अटक करण्यात आली आहे आणि तिच्याविरोधात आयपीसी सेक्शन 363, 365, 366 ए, 370, 372 आणि 373 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडित मुलीला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.