शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर रोड होणार आणखी सुसाट

By admin | Updated: September 8, 2016 02:52 IST

नवीन ठाणे समजल्या जाणाऱ्या घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी लक्षात घेऊन एमएमआरडीएने आता या मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे निश्चित केले आहे.

ठाणे : नवीन ठाणे समजल्या जाणाऱ्या घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी लक्षात घेऊन एमएमआरडीएने आता या मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे निश्चित केले आहे. यात आनंदनगर, कासारवडवली आणि ओवळा-माजिवडा येथील उड्डाणपुलांचा समावेश असून हे पूल झाल्यास घोडबंदर रोडवरील वाहतूक आणखी सुसाट होणार आहे. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक आणि ठाणे महापालिकेच्या मागणीनुसार एमएमआरडीए हे उड्डाणपूल बांधणार असून त्यांच्या बांधकामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्रकल्प सल्लागार नेमण्यासाठी एमएमआरडीएने एकीकडे निविदा मागवल्या असताना दुसरीकडे ते बांधण्यासाठीच्या पूर्वीच्या अटी आणि शर्तींत काही मोजके बदलही केले आहेत.ठाणे शहरासह घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मोठ्या चतुराईने स्थानिकांना विश्वासात घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण केले. या तीन ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास पावसाळ्यात पाणी साचून कोंडी होणार नाही, याकरिता या तिन्ही पुलांचा उतारा शोधला आहे.याबाबत, आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या मार्गावरील वाहतूककोंडी सोडवून घोडबंदर परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन आपण या मार्गावर उड्डाणपुलासाठी सुमारे ८० कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करून घेतला आहे. मात्र, तीनऐवजी एक अखंड उन्नत मार्ग बांधल्यास येथील वाहतूक सुरळीत व सुसाट होऊन वाहनचालकांचा वेळ, श्रम आणि पैशांसह इंधनात बचत होईल, असा प्रस्ताव आपण एमएमआरडीएला दिला आहे. त्यानुसार, त्यांच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून आता प्रकल्प सल्लागार नेमण्यासाठी या निविदा मागवल्या आहेत. त्या तीन उड्डाणपुलांसाठी असल्या तरी आपल्या सूचनेनुसार एक अखंड उन्नत मार्ग बांधता येईल काय, याचाही विचार त्यात केला जाणार आहे. येत्या डिसेंबरअखेर या कामास सुरुवात करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने आपणास दिले असल्याचे सरनाईक म्हणाले. (खास प्रतिनिधी)