Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्ग कोणते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:04 IST2025-12-12T11:03:19+5:302025-12-12T11:04:23+5:30
Ghodbunder Road Traffic Update: घोडबंदर मार्गवर ठाणे महापालिका हद्दीतील गायमुख चढण ते काजूपाडा खिंडपर्यंतच्या रस्त्याची झालेली दुरावस्था रस्ता दुरुस्तीची जबाबदारी घेण्यावरून कायम होती.

Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्ग कोणते?
Ghodbunder Road Traffic Diversion: घोडबंदर मार्गावर मीरा भाईंदर व ठाणे हद्दीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आता पुन्हा १२ डिसेंबरपासून १४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत, असे ३ दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा घोडबंदर मार्ग जाम राहणार आहे.
घोडबंदर मार्गवर ठाणे महापालिका हद्दीतील गायमुख चढण ते काजूपाडा खिंडपर्यंतच्या रस्त्याची झालेली दुरावस्था रस्ता दुरुस्तीची जबाबदारी घेण्यावरून कायम होती. अखेर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या तळाचे ग्राऊंटिंग काम तर ठाणे महापालिकेकडून त्यावरील थर हा मास्टिक अस्फाल्टचा करण्याची विभागणी झाली.
हे काम १२ डिसेंबरपासून १४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत केले जाणार आहे. याशिवाय मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील राहिलेला रस्ता मजबुतीकरणचे काम पण पूर्ण केले जाणार आहे. या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतुकीचे नियोजन म्हणून घोडबंदर मार्गावर सलग ३ दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग कोणता?
अवजड वाहनांना विरारच्या शिरसाड फाटा-अंबाडी मार्गे व वसईच्या चिंचोटी फाटा-कामण मार्गे जाण्याचे आदेश मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाने जारी केले आहेत. आतापर्यंत अवजड वाहन बंदी हा वाहतूक पोलिसांचा फुसका बार ठरला असून, आता तरी त्याची वाहतूक पोलीस काटेकोर अमलबजावणी करतील की नाही ? ह्या बद्दल साशंकता आहे.