युएलसी घोटाळ्यातील आरोपी घेवारे यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 07:59 PM2021-06-20T19:59:18+5:302021-06-20T19:59:35+5:30

मीरा भाईंदर मधील गाजत असलेल्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले महापालिकेचे नगर रचनाकार दिलीप घेवारे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ठाणे न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे .

Gheware accused in the ULC scam bail decision on Wednesday | युएलसी घोटाळ्यातील आरोपी घेवारे यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी निर्णय 

युएलसी घोटाळ्यातील आरोपी घेवारे यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी निर्णय 

Next

id=":28">मीरा रोड - मीरा भाईंदर मधील गाजत असलेल्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले महापालिकेचे नगर रचनाकार दिलीप घेवारे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ठाणे न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे . 

बनावट यूएलसी प्रमाणपत्र द्वारे रहिवास क्षेत्र असताना हरित क्षेत्र दाखवून इमारती उभारून शासनाला १०२ कोटी रुपयांना चुना लावणाऱ्या अधिकारी व बिल्डर यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी नव्याने तपास करून मीरा भाईंदर महापालिकेचे निवृत्त सहाय्यक नगररचनाकार सत्यवान धनेगावे, वास्तुविशारद चंद्रशेखर लिमये, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आरेखक असलेले भरत कांबळे या तिघांना १० जून रोजी अटक करण्यात आली होती. सध्या त्यांची रवानगी ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

 तर या घोटाळ्यातील मुख्य पाहिजेत आरोपी महापालिकेचे नगर रचनाकार दिलीप घेवारे यांचा शोध पोलीस घेत असून ते अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. परंतु घेवारे यांच्या वतीने ठाणे न्यायालयात न्यायाधीश आर. आर. काकाणी यांच्या कडे अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी घेवारे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जास विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी जोरदार विरोध केला.

 सुमारे तीन तास चाललेल्या या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी निर्णय बुधवार २३ जून रोजी देण्याचे म्हटले आहे. त्यामुळे २३ जून रोजी घेवारे यांना अटक पूर्व जामीन मिळणार की त्यांचा अर्ज फेटाळला जाणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Gheware accused in the ULC scam bail decision on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.