वाहतुकीसाठी ११ भूखंड ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:54 IST2017-08-03T01:54:55+5:302017-08-03T01:54:55+5:30
भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर एकीकडून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण यांच्या मध्येच ठाणे शहरआहे. त्यामुळे येथून येण्याजाण्यासाठी ठाण्याशिवाय पर्याय नाही.

वाहतुकीसाठी ११ भूखंड ताब्यात
ठाणे : भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर एकीकडून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण यांच्या मध्येच ठाणे शहरआहे. त्यामुळे येथून येण्याजाण्यासाठी ठाण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच, वाहनांची संख्या वाढत असून रस्ते तेच आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न जटिल होत आहे. वाहतुक ीला शिस्त लावण्यासाठी जिल्ह्यातील महापालिकांनी ११ भूखंड वाहतूक शाखेसाठी मंजूर केलेले आहेत. काही तांत्रिक बाबीमुळे ते अद्यापही वाहतूक शाखेच्या ताब्यात आलेले नाहीत. ते कसे लवकर ताब्यात येतील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच सध्या कारवाई केलेली वाहने उभी करण्यासाठी महापालिकेच्या बंद असलेल्या जकातनाक्यांची जागा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ठाणे शहर पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.
वाहतूक शिस्तीसाठी एकंदरीत १५ गोष्टींचा विचार केला असून त्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये चारचाकी वाहनांवर कारवाई केल्यास ती वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच जॅमर आणि बॅरिकेट नाहीत. मनुष्यबळही कमी आहे. नोपार्किंग, विनाहेल्मेट, उलटे वाहन घेऊन येणे, पे अॅण्ड पार्क यांचा समावेश आहे. त्यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातच दंडाची पावती फाडताना खर्च होणारा वेळ वाचवण्यासाठी ई-चलन प्रणाली लवकरच अमलात येणार असून हे काम शेवटच्या टप्प्यात आहे. सुरुवातीला प्रायोगिक पद्धतीवर ई-चलन प्रणाली राबवली जाणार आहे.