पावसाने पाठ फिरवतात भिवंडीतील नाल्यांमध्ये साचला कचरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:59 IST2023-10-18T17:56:32+5:302023-10-18T17:59:01+5:30
सध्या महिनाभरापासून पावसाने उसंत दिल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यांवरील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.

पावसाने पाठ फिरवतात भिवंडीतील नाल्यांमध्ये साचला कचरा
भिवंडी: महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली असल्याने शहरातील नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. जून महिन्यात महापालिका प्रशासनाने नालेसफाईवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला होता त्यानंतरही शहरातील नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याची ओरड स्थानिक नागरिकांनी केली होती. नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने पावसाळ्यात शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचले होते.
सध्या महिनाभरापासून पावसाने उसंत दिल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यांवरील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे नालेसफाई वर महापालिका प्रशासनाने केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या उधळींचा पितळ उघडे पडले आहे. भिवंडी कल्याण मार्गावर साईबाबा मंदिराच्या बाजूला असलेल्या नाल्यात प्रचंड कचरा साचला आहे अशीच परिस्थिती शहरातील इतरही नाल्यांची झाली आहे.