उल्हासनगरातील मटकाकिंगच्या मुलावर हल्ला करणारा गुंड हितेंद्र ठाकूर जेरबंद

By सदानंद नाईक | Published: April 28, 2024 05:03 PM2024-04-28T17:03:10+5:302024-04-28T17:03:22+5:30

उल्हासनगरात मटकाकिंग म्हणून ओळख असलेल्या संदीप गायकवाड याच्यावर २०२० साली गोळीबार केल्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हितेंद्र ठाकूर या गुंडाला अटक केली होती.

Gangster Hitendra Thakur jailed for attacking Matkaking's son in Ulhasnagar | उल्हासनगरातील मटकाकिंगच्या मुलावर हल्ला करणारा गुंड हितेंद्र ठाकूर जेरबंद

उल्हासनगरातील मटकाकिंगच्या मुलावर हल्ला करणारा गुंड हितेंद्र ठाकूर जेरबंद

उल्हासनगर : शहरातील एका मटकाकिंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडाला तब्बल दोन वर्षांनी पोलिसांनी गुजरात मध्ये जेरबंद केले. विशेष म्हणजे २०२० मध्ये हितेंद्र ठाकूर नावाच्या या गुंडाने श्रीराम चौकातील डान्सबार समोर संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.

उल्हासनगरात मटकाकिंग म्हणून ओळख असलेल्या संदीप गायकवाड याच्यावर २०२० साली गोळीबार केल्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हितेंद्र ठाकूर या गुंडाला अटक केली होती. जेलमधून बाहेर आल्यावर गुंड हितेंद्र ठाकूर याने संदीप गायकवाड याचा मुलगा प्रथम याच्यावर ९ डिसेंबर २०२२ साली सी.ब्लॉक येथे सहकारी राहुल पगारे, अजय बागुल, योगेश वाघ आदींनी चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. त्यावेळी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आल्याने हल्लेखोरांनी पळ काढला होता. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी राहुल पगारे,अजय बागुल,योगेश वाघ याना अटक केली होती. मात्र हितेंद्र उर्फ हितेन ठाकुर हा फरार झाला. 

गुंड हितेंद्र ठाकूर हा आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडु, गुजरात,राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश याठिकाणी सिमकार्ड बदलून वास्तव्य करून आपले अस्तित्व लपवुन राहत होता. त्यामुळे कौशल्यपुर्वक व तांत्रिकदृष्ट्या तपास करून ठाकुरचा ठावठिकाणा मिळविणे पोलीस पथकाला कठीण जात होते. मात्र त्याने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून टाकलेल्या पोस्टमुळे तो फसला. ठाकूर हा गुजरात वापी येथील कांचननगर येथे असल्याचे निष्पन्न झाल्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे,पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मालशेटे, पोलीस हवालदार प्रविण जाधव, प्रविण पाटील, विलास जरग, महेश बगाड, सुशांत हांडे देशमुख, प्रविण इंगळे यांच्या पथकाने वापी मध्ये सापळा रचून गुंड हितेंद्र ठाकूर याला जेरबंद केले. शनिवारी उल्हासनगर न्यायालयाने त्याला ५ दिवसाची पोलीस कोठडी दिली. हितेंद्र हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नारपोली पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी व चोरीचे एकुण ५ गुन्हे व पडघा पोलीस स्टेशन मध्ये घरफोडीचे २ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Gangster Hitendra Thakur jailed for attacking Matkaking's son in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.