ठाण्यासह पाच जिल्हयातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: June 16, 2023 21:01 IST2023-06-16T21:00:56+5:302023-06-16T21:01:16+5:30

कोपरी पोलिसांची कारवाई: चाकूही जप्त

Gangster arrested from five districts including Thane | ठाण्यासह पाच जिल्हयातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक

ठाण्यासह पाच जिल्हयातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक

ठाणे: ठाण्यासह पाच जिल्हयातून हद्दपार केलेल्या चंद्रमणी सिध्दार्थ मोरे (२५, रा. कोपरी, ठाणे) या गुंडाला लोखंडी चाकूसह अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्याच्याविरुद्ध मनाई आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रमणी याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला वागळे इस्टेट परिमंडळाच्या पोलीस उपायुक्त ांनी त्याला ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवीमुंबई, रायगड आणि पालघर या पाच जिल्हयातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश ५ आॅगस्ट २०२२ रोजी दिले होते. तरीही तो ठाणे शहर परिसरात विना परवानगी मोकाट फिरत असल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली होती. त्याच आधारे त्याला १५ जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास लोखंडी चाकूसह कोपरी पोलिसांनी अटक केली.

Web Title: Gangster arrested from five districts including Thane