शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

भाडेतत्त्वावर वाहने घेऊन विकणारी टाेळी ठाण्यात जेरबंद, 12 गुन्हे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 11:37 IST

कापूरबावडी पोलीस ठाण्यात अलीकडेच मोटारवाहन चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वाहने चोरीसह भाडेतत्त्वावरील वाहनांची विक्री करून लाखोंची फसवणूक करणाऱ्या परवेझ इक्बाल सैयद (३४, रा. मुंबई , मूळ रा. लोहियानगर, हुबळी, कर्नाटक) या अट्टल चाेरट्याला कर्नाटक येथून, तर त्याचा साथीदार फयाझ अहमद मोहिब्बुल हक (५४, रा. कुर्ला, मुंबई) याला मुंबईतून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून  सहा वाहने आणि मोडीत काढलेल्या चार वाहनांचे इंजिन असा २१ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

कापूरबावडी पोलीस ठाण्यात अलीकडेच मोटारवाहन चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता. परिसरातील वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांचे एक पथक निर्माण केले होते. या पथकाने सलग पाच दिवस अथक परिश्रम घेऊन ठाणे, कल्याण, सातारा, कोल्हापूर, हुबळी (कर्नाटक) येथे जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज, मोटारीच्या गॅरेजमधील मेकॅनिक, स्थानिक नागरिक आणि तांत्रिक तपास करून हुबळी येथून परवेझ सैयद याला १२ सप्टेंबरला नवी मुंबईतून चोरी केलेल्या एका कारसह ताब्यात घेतले. त्याने कारच्या चोरीची कबुली दिल्यानंतर त्याला १३ सप्टेंबरला अटक केली.  न्यायालयाने त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईतील १२ गुन्हे उघडचोरीच्या तपासात परवेझ याच्याकडून मुंबईतील सहार, मुलुंडमध्ये चार तसेच ठाण्यातील कापूरबावडी, कळवा, मुंब्रा येथे सात आणि नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीमधील एक  असे १२ गुन्हे उघड झाले आहेत. तपासात सहा कार आणि चार भंगारातील वाहनांचे इंजिनसह सुटे भाग असा २१ लाख दहा हजारांचा  मुद्देमाल जप्त केला.

वाहने भाडेतत्त्वावर घेऊन फसवणूकअटक केल्यानंतर परवेझ याने पोलिसांना कबुली दिली की, त्याने अशाच प्रकारे इतरही कारची चोरी केली. त्याचबरोबर नागरिकांना अधिक भाड्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वाहने भाडेतत्त्वावर घेऊन त्या इतर लोकांना खोटी कारणे सांगून त्यांची विक्री केल्याचेही उघड झाले. यातील काही वाहने त्याने  फयाझ अहमद मोहिब्बुल हक याला भंगारामध्ये विक्री केली. फयाझ याचाही या गुन्ह्यात सहभाग उघड झाल्याने त्यालाही या  गुन्ह्यात अटक केली.

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारी