ठामपातर्फे क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळासाठी 'गणेश आरास स्पर्धा'; पहिले पारितोषिक दहा हजार रुपये
By जितेंद्र कालेकर | Updated: August 30, 2022 20:48 IST2022-08-30T20:48:23+5:302022-08-30T20:48:47+5:30
ठाणे महापालिका क्षेत्रातील अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे या आरास स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

ठामपातर्फे क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळासाठी 'गणेश आरास स्पर्धा'; पहिले पारितोषिक दहा हजार रुपये
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सार्वजनिक मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी केले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे या आरास स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. आरास स्पर्धेसाठी देखाव्यात कलात्मकतेबरोबर उद्देशही विचारात घेतला जाईल. कोणत्या धर्माविषयी असहिष्णू वृत्ती प्रकट करणा-या देखाव्यांचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. आरास स्पर्धेबरोबर उत्कृष्ट मूर्ती आणि स्वच्छता यासाठी पारितोषिके देण्यात येतील.
स्पर्धेतील विजेत्या सार्वजनिक मंडळाना दहा हजार रुपयांचे पहिले पारितोषिक, साडे सात हजारांचे दुसरे पारितोषिक तर साडे सहा हजारांचे ितसरे अशी एकूण आठ बक्षिसे, स्मृतीचिन्हे आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेमधील सहभागी मंडळांना निर्धारीत केलेल्या अटी व शर्ती लागू राहतील. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या संस्थांना तसेच गणेशोत्सव मंडळांना अर्जाचे नमुने, माहिती व जनसंपर्क विभाग, महापालिका भवन, पहिला मजला, पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम) येथे १ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० आ िण दुपारी २.३० ते ५ या वेळेत मिळतील. अर्ज स्विकारण्याची २ सप्टेंबर २०२२ ही अंितम तारीख असून या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नसल्याचे महापािलका प्रशासनाने म्हटले आहे.