शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

सिमांकन निश्चित करण्यासाठी गावठाण, कोळीवाड्यातील रहिवाशांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 5:53 PM

महापालिकेने गाठवाण कोळीवाड्यांचा विरोध डावलून क्लस्टरसाठी बायोमेट्रीक सर्व्हे करण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयाविरोधात गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.

ठळक मुद्देसिमांकन झाल्यानंतरच सर्व्हे कराहाजुरी क्लस्टर मधून वगळावे

ठाणे - ठाण्यातील गावठाण कोळीवाड्यातील सीमांकनाची समस्या तसेच सीमांकन निश्चत झाल्याशिवाय क्लस्टर योजना राबविण्यात येऊ नये, आदींसह इतर मागण्यांचे निवेदन ठाण्यासह जिल्ह्यातील गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले.                          यावेळी बाळकुम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील कोळीवाडे व गावठाणातील भूमिपुत्र बांधवांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या चर्चेत बाळकुम येथील विविध कंपनीने स्थानिक शेतकºयांच्या जमिनीचे केलेले भूसंपादन या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.परंतु हा विषय किचकट आणि गुंतागुंतीचा असल्याने त्यावर पुढील चार ते पाच दिवसात पुन्हा चर्चा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले. क्लस्टर योजना व कोळीवाडा गावठाण विस्तारीत सिमांकन या विषयावर चर्चा करताना महसूलमंत्री व मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ठाणे शहरातील कोळीवाडे व गावठाण क्लस्टर योजनेतून वगळण्यात आली आहेत तरी देखील ठाण्यातील हजुरी गावठाण हे क्लस्टर योजनेत घेण्यात आले आहे. त्यामुळे ते वगळण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच आपल्या व महसूल विभागाच्या अख्यारित असलेल्या नगर भू मापन विभागामार्फत महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील कोळीवाडे व गावठणांचे विस्तारित सिमांकन पूर्ण होत नाही तोवर चेंदणी कोळीवाडा, राबोडी व हाजुरी या परिसरात ठाणे महापालिकेतर्फे सुरू होणारे बायोमेट्रिक सर्वेक्षण करु नये अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय कोस्टल रोड, मेट्रो कास्टिंग यार्ड, कांदळवन, ग्रामविकास सोसायटी या विविध विषयावरंवर सुध्दा यावेळी चर्चा करण्यात आली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcollectorजिल्हाधिकारी