शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
8
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
9
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
10
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
11
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
12
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
13
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
14
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
17
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
18
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
19
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
20
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बसवरील कारवाईचा फुसका बार

By admin | Updated: March 20, 2016 00:51 IST

ठाण्यात गुरुवारी सकाळी खासगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला बसच्या क्लीनरने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी दिवसभरात ५४ बसवर

ठाणे : ठाण्यात गुरुवारी सकाळी खासगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला बसच्या क्लीनरने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी दिवसभरात ५४ बसवर कारवाई केली. परंतु, या कारवाईचा फुसका बार संध्याकाळीच फुटला. शुक्रवारी संध्याकाळपासून या बस पुन्हा रस्त्यावर वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या नाकावर टिच्चून धावत होत्या. त्यामुळे या फुसक्या कारवाईमागचे गौडबंगाल काय, अशी चर्चा मात्र शहरभर सुरू झाली आहे.
गुरुवारी फ्लॉवर व्हॅली परिसरात घडलेल्या घटनेनंतर याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर, वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासूनच विविध ठिकाणी आपली कुमक ठेवून ठिकठिकाणी खासगी बसच्या मुसक्या आवळल्या होत्या. परंतु, सूर्य मावळला आणि पुन्हा या बस रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली. मात्र, यात तीनहातनाक्याचे बस उभ्या राहण्याचे ठिकाण काहीसे पुढे नेले. त्यानंतर, शनिवारी सकाळीदेखील नितीन कंपनी, कॅडबरी आदी जंक्शनवरून खासगी बस सुटत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे या फुसक्या कारवाईमागचे गमक काय, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. मागील वेळेसही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. तसेच आरटीओने बस जप्तीचा इशाराही दिला होता. त्यानंतर, काही दिवस बंद राहिलेल्या या बस पुन्हा रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली होती. आताही दिवस सरत नाही, तोच पुन्हा बस रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.