भिवंडीत राजलक्ष्मी कंपाउंडमध्ये लागली भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 17:29 IST2018-12-18T17:28:09+5:302018-12-18T17:29:44+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. पुठ्याचे गोदाम असल्याने आगीचा भडका वाढला आणि आग पसरत गेली. मात्र, अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

भिवंडीत राजलक्ष्मी कंपाउंडमध्ये लागली भीषण आग
ठाणे - मुंबईत कामगार रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर अग्निकांडाचे सत्र सुरूच आहे. आज दुपारी ३. १५ वाजताच्या सुमारास भिवंडीतील काल्हेर परिसरातील राजलक्ष्मी कंपाउंड येथे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाचे 1 फायर वाहन व ठाणे अग्निशमन केंद्राचे बाळकूम येथील 1 जंबो वॉटर टँकर, वागळे अग्निशमन केंद्राचे 1 फायर वाहन दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. पुठ्याचे गोदाम असल्याने आगीचा भडका वाढला आणि आग पसरत गेली. मात्र, अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आली असल्याचे भिवंडी अग्निशमन केंद्रातून कळवण्यात आले.