ठाण्यातील मोकळ्या जागेवरील कचऱ्याची झळ चार गाड्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 20:41 IST2018-04-22T20:41:33+5:302018-04-22T20:41:33+5:30

सर्वत्र कच-या प्रश्न भेडसावत आहे, त्यातच ठाणे असो या कल्याण येथील डम्पींगवर आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच रविवारी दुपारी ठाण्यात एका मोकळ्या जागेवरील कच-याने पेट घेतला आहे.

Four garbage traps in Thane free space | ठाण्यातील मोकळ्या जागेवरील कचऱ्याची झळ चार गाड्यांना

ठाण्यातील मोकळ्या जागेवरील कचऱ्याची झळ चार गाड्यांना

ठाणे : घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे कच-याला लागलेल्या आगीत चार वाहने जळाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यामध्ये भंगारातील तीन वाहने जळून खाक झाली, तर उभ्या असलेल्या एका टेम्पोला या आगीची झळ बसली आहे. ही आग लावली की लागली, याबाबत समजू शकले नाही. परंतु, ही आग लावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ठामपा आपत्तीप्रमुख संतोष कदम यांनी सांगितले.
मानपाडा येथील टिकुजिनीवाडी रोडवर असलेल्या मोकळ्या जागेवर कचरा फेकण्यात येतो. तेथे पसरलेल्या कच-याला रविवारी दुपारी आग लागली. ठामपा आपत्ती व्यवस्थापक कक्षाला याबाबत माहिती देण्यात आल्यावर ठामपा अग्निशामक दलाचे एक इंजीन आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, अग्निशामक जवानांनी ही आग काही मिनिटांतच आटोक्यात आणली. मात्र, या आगीत मोकळ्या जागेत उभ्या केलेल्या भंगारातील एक जीप आणि दोन कार जळून खाक झाल्या आहेत. तसेच तेथे उभ्या असलेल्या टेम्पोलाही आगीची झळ बसल्याने टेम्पोचा पुढील भाग जळाला आहे. हा टेम्पो सोमनाथ यादव यांचा आहे.
 

 

 

Web Title: Four garbage traps in Thane free space