सोनसाखळी, मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या इराणीसह चौघांना अटक; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 01:44 IST2026-02-14T01:41:04+5:302026-02-14T01:44:36+5:30

दहा लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत...

Four arrested including Irani for stealing gold chain, mobile phone; Thane Crime Branch's performance | सोनसाखळी, मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या इराणीसह चौघांना अटक; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

सोनसाखळी, मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या इराणीसह चौघांना अटक; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

ठाणे : ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगरसह कर्जत आणि पुणे रेल्वे कार्यक्षेत्रात साेनसाखळी जबरी चाेरी तसेच माेबाईल जबरी चाेरीसह बतावणी करीत लुटमार करणाऱ्या माेहम्मद जाफरी (रा. लाेणी काळभाेर, पुणे) याच्यासह चाैघांना भिवंडी युनिटने अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्या ताब्यातून दहा लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चाैघांमध्ये चाेरीचा माल विकत घेणाऱ्या दाेघांचाही समावेश आहे.

भिवंडी परिसरात वाढत्या माेबाईल आणि साेनसाखळी जबरी चाेरीच्या अनुषंगाने गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पाेलीस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी ठाणे पालिसांना दिले हाेते. गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटचे वरिष्ठ पेालीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळालेल्या गाेपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रवींद्र भाेसले (रा. नारपाेली, भिवडी) याला ४ फेब्रुवारी २०२६ राेजी सहायक पाेलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथून भाेईर, रवींद्र पाटील, राजेंश शिंदे आणि रामचंद्र जाधव आदींच्या पथकाने सापळा रचून भिवंडीतील कल्याण भिवंडीतून अटक केली. त्याने भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, कर्जत आणि पुणे रेल्वे आदी भागांमध्ये साेनसाखळी आणि माेबाईल जबरी चाेरी केल्याचे गुन्हे केल्याची कबूली दिली. त्याने चाेरीतील ऐवज दिनेश पाटील (४७) रा. आंबिवली, कल्याण) याच्याकडे विक्री केल्याचे सांगितले. या दाेघांनाही भिवडी शहर पेालीस ठाण्यातील दाखल असलेल्या जबरी चाेरीच्या गुन्हयात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पाच लाख ६१ हजारांचे १५ ताेळे सहा ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने आणि २१ माेबाईल असा आठ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्याकडून भिवंडी आणि ठाण्यातील प्रत्येकी चार, रेल्वेचे पाच आणि बदलापूरातील दाेन आणि कल्याणमधील एक असे १६ गुन्हे उघडकीस आले.

बतावणी करणाऱ्या दाेघांना अटक-
पाेलीस असल्याची बतावणी करणाऱ्या माे. अजीज जाफरी यालाही वरिष्ठ पेालीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. चाैकशीत भिवंडीतील शांतीनगर आणि नारपाेली भागात बतावणी करुन फसवणूक केल्याच्या दाेन गुन्हयांची कबूली दिली. चाेरीतील ऐवज त्याने कर्नाटक राज्यातील मनेकल्ली येथील रहिवासी श्रीकांत गबाळे यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यालाही अटक करुन त्याच्याकडून दाेन लाख २० हजारांचे ४५ ग्रॅम वजनाचे साेनाचे दागिने हस्तगत केले.
 

Web Title : ईरानी सहित चेन स्नैचर, मोबाइल चोर गिरफ्तार; ठाणे अपराध शाखा की कार्रवाई।

Web Summary : ठाणे पुलिस ने ठाणे, भिवंडी, और कल्याण में चेन स्नैचिंग और मोबाइल चोरी के आरोप में एक ईरानी सहित चार लोगों को गिरफ्तार किया। पुलिस ने 10.75 लाख रुपये का चोरी का माल बरामद किया, जिसमें सोना और मोबाइल शामिल हैं। चोरी की संपत्ति के दो रिसीवर भी गिरफ्तार।

Web Title : Chain snatchers, mobile thieves, including Iranian, arrested; Thane crime branch action.

Web Summary : Thane police arrested four, including an Iranian, for chain snatching and mobile theft in Thane, Bhiwandi, and Kalyan. Police recovered stolen goods worth ₹10.75 lakh, including gold and mobiles. Two receivers of stolen property were also arrested.

टॅग्स :thaneठाणे