रसिकांच्या साक्षीने ठाण्यात रंगण एक मुक्त व्यासपीठची स्थापना, कवी संदीप खरे यांना प्रथम रंगण पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 05:20 PM2018-02-28T17:20:59+5:302018-02-28T17:20:59+5:30

रसिकांच्या साक्षीने ठाण्यात रंगण एक मुक्त व्यासपीठची स्थापना झाली . यावेळी कवी संदीप खरे यांना प्रथम रंगण पुरस्कार प्रदान करण्यात आला

Foundation of an open platform in Thane in Thane, Sandeep khare for the first color award | रसिकांच्या साक्षीने ठाण्यात रंगण एक मुक्त व्यासपीठची स्थापना, कवी संदीप खरे यांना प्रथम रंगण पुरस्कार प्रदान

रसिकांच्या साक्षीने ठाण्यात रंगण एक मुक्त व्यासपीठची स्थापना, कवी संदीप खरे यांना प्रथम रंगण पुरस्कार प्रदान

Next
ठळक मुद्देरंगण एक मुक्त व्यासपीठची स्थापनाकवी संदीप खरे यांना प्रथम रंगण पुरस्कार प्रदानरंगण ही संस्था नसून उत्तम कलाकारांच्या शोधात असलेले मुक्त व्यासपीठ - अभिजीत पानसे

ठाणे : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून घंटाळी प्रबोधिनीच्या सहकार्याने कला, क्रि डा आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाºया संस्था व नागरिकांना एकत्रित करणारे ‘रंगण....एक मुक्त व्यासपीठ’ची स्थापना रसिक प्रेक्षक आणि मान्यवरांच्या साक्षीने झाली. या निमित्ताने कवी संदिप खरे यांची ‘मौनाची भाषांतरे’ या रसिकप्रिय कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
     मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मंगळवारी घंटाळी मैदान येथे रंगणची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी केले. ते म्हणाले की, रंगण हे मुक्त व्यासपीठ केवळ मराठी भाषेपुरते सिमीत नसून त्याला भाषेच्या कोणत्याही सीमा, बंधनं नाहीत. रंगणची स्थापना तुम्ही आम्ही मिळून करणार आहोत. त्यामुळे त्याला कोणतेही खोटे आवरण नसेल. रंगण ही संस्था नसून उत्तम कलाकारांच्या शोधात असलेले हे मुक्त व्यासपीठ आहे असे ते म्हणाले. या सोहळ््यात रंगण परिवाराकडून कवी संदीप खरे यांना प्रथम रंगण पुरस्कार १० हजार रु पये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मराठी कविता ही फार अवजड, कंटाळवाणी नाही. प्रत्येक कलेची मुळाक्षरे असतात त्याप्रमाणे कविता ही समजून घेतली पाहिजे असे कवी संदीप खरे म्हणाले. कवी संदीप खरे यांनी पाऊसराव, दिवस असे की मी कोणाचा नाही.. कोणी माझे नाही, तुझं बघता हिशोब सारा चुकला होता यांसारख्या त्यांच्या अनेक कविता सादर केल्या. त्यांच्या प्रत्येक कवितेला रसिकांनी भरभरुन दाद दिली. कागदावरचा शब्द लोकांच्या मनापर्यंत पोचवण्याची कला संदीप खरे यांच्यामध्ये आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी काढले. मला रंगण हे नाव खूप आवडले आहे असे सांगत या नावात रंग आणि रण आहे असे ते म्हणाले. या कार्यक्र मासाठी अभिनेते संजय नार्वेकर, उदय सबनीस, माजी नगरसेवक विलास सामंत, चैतन्य सामंत, श्रीरंग खटावकर, वरूण कुंदन, हर्षदा बोरकर, अश्विनी पानसे, पंकज पालखे, महेश अंबर, गोकुळ चोरघे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माच्या पूर्वार्धात नृत्यविष्कार, काव्यवाचन, अभिवाचन झाले. कार्यक्र माचे निवेदन डॉ. अरु ंधती भालेराव यांनी केले.

Web Title: Foundation of an open platform in Thane in Thane, Sandeep khare for the first color award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.