ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना कोरोनाची लागण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 20:35 IST2020-09-09T20:34:36+5:302020-09-09T20:35:30+5:30

डॉक्टरांनी संजय मोरे यांना औषधे दिली होती, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.  त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता.

Former Thane mayor Sanjay More infected with corona | ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना कोरोनाची लागण  

ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना कोरोनाची लागण  

ठळक मुद्देडॉक्टरांनी संजय मोरे यांना औषधे दिली होती, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.  त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता.

ठाणे - ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांनादेखील आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या त्यांच्यावर मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे ते घरीच होते.

डॉक्टरांनी संजय मोरे यांना औषधे दिली होती, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.  त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी कोरोनाची चाचणी केली. चाचणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसापूर्वीच त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांची बायपास झाली असल्याने डॉक्टर त्यांच्यावर देखरेख ठेवून आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Web Title: Former Thane mayor Sanjay More infected with corona