शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
4
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
5
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
6
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
7
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
8
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
9
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
10
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
11
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
12
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
13
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
14
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
15
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
16
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
17
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
18
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
19
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
20
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक काेंडीचा माजी खासदार राजन विचारेंनाही फटका; पाेलिस आयुक्तांकडे मांडले गाऱ्हाणे

By जितेंद्र कालेकर | Updated: September 5, 2024 20:35 IST

राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही याच काेंडीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन आंदाेलन केले.

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: घाेडबंदर मार्गावर गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक काेंडी झाली. याच काेंडीचा मुंबईकडे निघालेले ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनाही फटका बसला. तब्बल चार तास याच काेंडीत ते अडकले हाेते. त्यामुळेच आम्हाला नकाे विकास, नकाे ठाण्याचा मुख्यमंत्री आम्हाला वाहतूक काेंडीतून सुटका द्यावी, अशी मागणीच करणारे निवेदन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांना दिले. दाेन दिवसांमध्ये जर या वाहतूकीत सुधारणा झाली नाहीतर तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशाराही विचारे यांनी यावेळी दिला. दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही याच काेंडीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन आंदाेलन केले.

विचारे यांच्यासह शिष्टमंडळाने डुंबरे यांची भेट घेत हे निवेदन दिले. मुख्यमंत्री ठाण्यातील असल्याने शहरात फिरत असताना शहरातील अंतर्गत रस्ते सुद्धा बंद केले जातात. तसेच सध्या ठाण्यातील राजकारण्यांना व त्यांच्या स्वीय सहाय्यक (पी ए) आणि कुटुंबियांना दिलेली सुरक्षा कमी करून नाक्या-नाक्यावर वाहतूक पोलीस अधिकारी तैनात करावेत.

तसेच गेल्या २ वर्षापासून मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्यामुळेही वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे. वारंवार प्रशासनाला कळवूनही त्याचे योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्याने प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचा आराेपीही विचारे यांनी आपल्या निवेदनात केला आहे. नवी मुंबई आणि पुण्याप्रमाणे दिवसा ठाणे शहरात जड अवजड वाहनांना बंदी केली जावी, याकडेही विचारे यांनी पाेलिस आयुक्तांचे लक्ष वेधले. स्कूल बसेस शाळेच्या कॅम्प्स मध्ये न लावता बाहेरील रस्त्यावर उभी केली जातात त्यामुळेही हिरानंदानी ते ठाणे प्रवासाला एक तास लागताे, असेही त्यांनी यात म्हटले आहे. वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडवणारे शासन प्रशासन काेंडीला जबाबदार असल्याचा आरोप ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

ठाण्यातील कोंडीला वाहतूक पोलिसांचे फसलेले नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल आणि अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. आंदोलकांनी वाहतूक पोलीस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.

टॅग्स :rajan vichareराजन विचारे