शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

आयुक्तांच्या प्रशासकीय बैठकीत माजी आमदार झाले सहभागी; शिवसेना, मनसे, काँग्रेसचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 08:20 IST

मीरा भाईंदर महापालिका प्रशासनासह आयुक्त बालाजी खतगावकर यांचा कारभार हा तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांच्या कला नुसार चालत आलेला आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या प्रशासकीय बैठकीत महापौरांसह शिरकाव करून माजी आमदारांनी सहभाग घेतल्या वरून शिवसेना, काँग्रेस,  मनसे आदींनी टीकेची झोड उठवली आहे. आयुक्तांनीच माजी आमदारांसाठी बैठक बोलावल्याचा आरोप केला आहे. आयुक्तांनी मात्र प्रशासकीय बैठक सुरू असताना महापौर व माजी आमदार आले व बैठकीत सहभागी झाल्याचे मान्य करत बाकी आरोप फेटाळले आहेत. 

मीरा भाईंदर महापालिका प्रशासनासह आयुक्त बालाजी खतगावकर यांचा कारभार हा तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांच्या कला नुसार चालत आलेला आहे. यातूनच बेकायदेशीर बांधकामांना दिले जाणारे संरक्षण, नियमबाह्य निर्णय, पर्यावरणाचा ऱ्हास , प्रशासकीय कामात नियमबाह्य सहभाग व हस्तक्षेप , गैरप्रकार आदी अनेक आरोप महापालिका आयुक्तांपासून प्रशासनावर होत आले आहेत. पालिकेत होणाऱ्या बैठकादेखील वादाचा विषय ठरल्या आहेत. मेहतांनी देखील पालिकेच्या कामातच जास्त रस दाखवला आहे.विधानसभा निवडणुकीत मेहतांचा पराभव झाल्याने ते आता आमदार नाहीत. तरी देखील आयुक्तांनी सोमवारी पालिका अधिकाऱ्यांची प्रशासकीय बैठक बोलावून त्यात मेहतांना सहभागी करून घेत बैठक चालवली. एक तासा पेक्षा जास्त चाललेल्या या बैठकीत मेहतांनीच बहुतांश बैठक चालवली असे पालिका सूत्रांनी सांगितले. 

आयुतांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यात माजी आमदारांना सहभागी करून घेतल्या वरून मनसेच्या पदाधिकारी अनु पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. पालिका बैठकांत माजी आमदारांना सहभागी करून बैठक चालवणे म्हणजे आयुक्तांनी लोचटपणाचा कहर केल्याचे पाटील म्हणाल्या. आयुक्तांसह संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 

काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी देखील या प्रकारा बद्दल आश्चर्य व्यक्त केले असून प्रशासकीय बैठकीत असा प्रकार खपवून घेणे गंभीर असल्याचे म्हटले आहे. बैठकीत कलम 37 खाली फेरबदल, विकास कर वाढ आदी देखील विषय झाल्याची माहिती मिळाल्याचे जुबेर म्हणाले.

पालिकेतील शिवसेनेच्या कामगार सेनेचे पदाधिकारी श्याम म्हाप्रलळर यांनी, आयुक्त खतगावकरच प्रशासकीय कामाचा बाजार मांडत असून गैरप्रकारांना संरक्षणच नव्हे तर त्यात सहभागी आहेत असे म्हटले आहे.  आयुक्तांच्या लोचटपणा मुळे पालिका प्रशासन एका नेत्याच्या दावणीला बांधले गेले आहे. आयुक्तां वर कारवाई झाली पाहिजे आणि अधिकाऱ्यांना बेकायदेशीर पणे अन्य कोणाच्या नावाने बोलावून बैठक, निर्देश देणे बंद करा अन्यथा सेनेला आपला हिसका दाखवू असा इशारा म्हाप्रळकर यांनी दिला आहे. आयुक्त खतगावकर यांनी मात्र आपण माजी आमदार वा महापौरांसाठी बैठक बोलावली नव्हती तर ती प्रशासकीय बैठक होती. प्रशासनाची बैठक सुरू असताना ते आले आणि सहभागी झाले . पण त्यात कोणाचे व्यक्तिगत नाही तर शहराचे विषय झाले असे आयुक्त म्हणाले.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMNSमनसेcongressकाँग्रेस