भिवंडीत माजी महापौर विलास पाटील यांना अटक; शिंदेसेनेने दुकाने केली बंद, प्रकरण काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:18 IST2026-02-14T14:17:11+5:302026-02-14T14:18:49+5:30

विलास पाटील यांनी आता सुद्धा त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेसोबत जवळीक वाढवून सदस्यांची जमवाजमव सुरू केली होती.

Former Mayor Vilas Patil arrested in Bhiwandi; Shinde Sena closed shops, what is the matter? | भिवंडीत माजी महापौर विलास पाटील यांना अटक; शिंदेसेनेने दुकाने केली बंद, प्रकरण काय आहे?

भिवंडीत माजी महापौर विलास पाटील यांना अटक; शिंदेसेनेने दुकाने केली बंद, प्रकरण काय आहे?

-नितीन पंडित, भिवंडी
कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख आणि माजी महापौर विलास आर. पाटील यांना ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. एका जमीन व्यवहार आर्थिक फसवणूक प्रकरणात शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ शिंदेसेनेने कल्याण रोड भाडवड परिसरातील दुकाने शनिवारी दुपारी बंद केली.

महानगरपालिका निवडणुकीनंतर विलास पाटील व भाजपा आमदार महेश चौघुले यांच्या गटात छत्रपती शिवाजी महाराज चौकात १८ जानेवारी रोजी हाणामारी व राडा झाला होता. या प्रकरणात विलास पाटील फरार होते. त्यांना ७ फेब्रुवारी रोजी अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.

विलास पाटील हे भिवंडी महानगरपालिका राजकारणात नेहमी किंग मेकरच्या भूमिकेत राहिले आहेत. आता सुद्धा त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेसोबत जवळीक वाढवून सदस्यांची जमवाजमव सुरू केली होती.

विलास पाटील यांच्या अटकेच्या बातमीनंतर भिवंडीत शिंदेसेनेकडून भादवड, टेमघर, नवी बस्ती या परिसरात नगरसेवक बाळाराम चौधरी, रोहित चौधरी व दिनमोहमद यांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद करण्यास सुरुवात केली आहे.

विलास पाटील यांना थोड्या वेळात भिवंडी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यासाठी शहरात आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Web Title : भिवंडी: पूर्व महापौर विलास पाटिल गिरफ्तार; शिंदे सेना ने दुकानें बंद कीं

Web Summary : भिवंडी में पूर्व महापौर विलास पाटिल को आर्थिक धोखाधड़ी के आरोप में गिरफ्तार किया गया। गिरफ्तारी के बाद, शिंदे सेना के कार्यकर्ताओं ने विरोध में दुकानें बंद करा दीं। पाटिल, एक प्रमुख राजनीतिक व्यक्ति, आगामी चुनावों के लिए गठबंधन बनाने की कोशिश कर रहे थे। पुलिस की उपस्थिति बढ़ाई गई है।

Web Title : Bhiwandi: Ex-Mayor Vilas Patil Arrested; Shinde Sena Shuts Shops

Web Summary : Ex-Mayor Vilas Patil was arrested in Bhiwandi for financial fraud. Following the arrest, Shinde Sena workers forced shops to close in protest. Patil, a key political figure, was attempting to form alliances for upcoming elections. Increased police presence is noted.