Former Mayor of Kalyan-Dombivali Rajendra Devalekar passes away | कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे निधन 

कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे निधन 

ठळक मुद्दे कल्याण-डोंबिवलीतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून राजेंद्र देवळेकर यांची ओळख होती. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाल्यानंतर राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी निवड करण्यात आली होती.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर आणि शिवसेनेच ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचे बुधवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र देवळेकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती. पण, आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी राजेंद्र देवळेकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र, अखेर राजेंद्र देवळेकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राजेंद्र देवळेकर यांच्या जाण्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधानाचे वृत्त समजताच सर्वपक्षीय राजकारणी आणि लोकप्रतिनिधींनी शोक व्यक्त केला आहे.

कल्याण-डोंबिवलीतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून राजेंद्र देवळेकर यांची ओळख होती. सलग चार वेळा राजेंद्र देवळेकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाल्यानंतर राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी निवड करण्यात आली होती. अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक कामे मार्ग लावली. पालिका कार्यक्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

आणखी बातम्या..

 बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज  

- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो    

- मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी    

-  Mumbai Rains: अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापने बंद; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन

Web Title: Former Mayor of Kalyan-Dombivali Rajendra Devalekar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.