माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 14:11 IST2018-04-05T14:11:23+5:302018-04-05T14:11:23+5:30
बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी तथा माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्याविरुद्ध अपसंपदा बाळगल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
ठाणे: बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी तथा माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्याविरुद्ध अपसंपदा बाळगल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. अधिकृत उत्पन्नापेक्षा 41 टक्के जादा संपत्ती बाळगल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यासह पत्नी, सासू, सासरे, ठाणे महापालिकेतील अधिकारी, सीए, बिल्डर अशा 32 जणांविरुद्ध ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने गुरुवारी सकाळी हा गुन्हा दाखल केला आहे, ठाणे महापालिकेत 1996 ते 2017 या काळात नगरसेवक असताना त्यांनी आपल्या शिवाईनगर येथील बंगल्यासह कोट्यवधींची मालमत्ता जमावल्याचे तपासात समोर आले आहे.