उल्हासनगरात राजगड गॅलक्सी इमारतीची लिफ्ट कोसळून माजी नगरसेवक हरेश जग्याशी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:17 IST2025-12-06T16:16:23+5:302025-12-06T16:17:26+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राजगड गॅलकशी नावाची सात मजली इमारत आहे. ४ डिसेंबर रोजी दुपारी माजी नगरसेवक हरेश जग्याशी हे काही नातेवाईकासह इमारती गेले होते.

उल्हासनगरात राजगड गॅलक्सी इमारतीची लिफ्ट कोसळून माजी नगरसेवक हरेश जग्याशी जखमी
उल्हासनगर : कॅम्प नं-३ मधील साई टेकचंद पुरी प्रवेशद्वार जवळील राजगड गॅलक्सी इमारतीची लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना ४ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या दुर्घटनेत माजी नगरसेवक हरेश जग्याशीसह त्यांचे नातेवाईक जखमी झाले आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राजगड गॅलकशी नावाची सात मजली इमारत आहे. ४ डिसेंबर रोजी दुपारी माजी नगरसेवक हरेश जग्याशी हे काही नातेवाईकासह इमारती गेले होते. इमारत लिप्ट मधून खाली येत असताना लिप्ट दुसऱ्या मजल्यावरून अचानक कोसळली. या अपघातात जग्याशी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यासोबत असलेले राकेश लालवानी व अन्य जण जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. इमारतीच्या लिफ्टची वेळेवर दुरुस्ती आणि देखभाल न केल्यामुळे हा बिघाड झाला आणि लिफ्ट कोसळली, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
राजगड गॅलसी या इमारत बांधणीला केवळ दीड ते दोन वर्ष झाले असून हलगर्जीपणामुळे लिफ्टचे ऑडिट झाले नसल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेनंतर इमारतीमधील लिफ्टच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, लिफ्टच्या नियमित तपासणी आणि देखभालीची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत हरेश जग्याशी यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही. तसेच इमारत रस्त्याला बाधित होत असल्याचे बोलले जात असून काहीएक कारवाई नाही.