बलात्कारप्रकरणी माजी नगरसेवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 23:49 IST2019-08-02T23:49:18+5:302019-08-02T23:49:39+5:30
अंबरनाथमधील घटना : गाळा दाखविण्याचे निमित्त

बलात्कारप्रकरणी माजी नगरसेवकाला अटक
उल्हासनगर : शिवसेनेचा पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रधान पाटील याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. पाटील याला गुरुवारी रात्री अटक केली.
उल्हासनगर महापालिकेत गेली १० वर्षे शिवसेना नगरसेवक राहिलेला पाटील बांधकाम व्यावसायिक आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथे राहणाऱ्या एका महिलेला ब्युटीपार्लरसाठी दुकानाचा गाळा हवा होता. याबाबत चौकशीसाठी त्याच्याकडे आली होती. पाटील याने या महिलेस वेगवेगळ्या ठिकाणी गाळे दाखवले. दरम्यान, २२ जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास पाटील याने महिलेस बोलावून स्वत:च्या गाडीतून गाळा दाखवण्याच्या निमित्ताने अंबरनाथमधील कानसई भागात नेले. गाडी निर्जन ठिकाणी उभी करून गाडीतच बळजबरीने अत्याचार केला. झालेल्या घटनेमुळे महिला प्रचंड घाबरली होती. अखेर, तिने शिवाजीनगर ठाणे गाठून पाटील याच्याविरोधात तक्र ार दाखल केली.