पाणी कपात रद्द करण्यासह माजी खा. नाईक यांनी आयुक्तांकडे केल्या विविध मागण्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 15:03 IST2018-03-29T15:03:10+5:302018-03-29T15:03:10+5:30
पाणी कपात रद्द करा, भुयारी मार्गाचे काम पुर्ण करा, उत्तन वासियांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्यांवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका आयुक्त बळीराम पवार यांना भेटुन चर्चा केली.

पाणी कपात रद्द करण्यासह माजी खा. नाईक यांनी आयुक्तांकडे केल्या विविध मागण्या
मीरारोड - पाणी कपात रद्द करा, भुयारी मार्गाचे काम पुर्ण करा, उत्तन वासियांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्यांवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका आयुक्त बळीराम पवार यांना भेटुन चर्चा केली. या वेळी पक्षाच्या वतीने ११ मागण्यांचे निवेदन दिले.
बुधवारी मीरा भार्इंदर महापालिकेत आयुक्त दालनात माजी खासदार नाईक यांनी पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश दुबोले, पोर्णिमा काटकर, नरेंद्र भाटिया, संतोष गोळे, साजिद पटेल, शिल्पा सावंत, रमेश गायकवाड, भिलारे, साळुंके आदि पदाधिकारी - कार्यकर्ते सोबत आयुक्त पवार यांच्या सोबत चर्चा केली. या वेळी दुबोले यांनी केलेल्या ११ मागण्यांचे निवेदन नाईक यांनी आयुक्तांना दिले.
शहरात पाणी कपात सुरु झाल्याने पाणी पुरवठा ३६ तासांच्या वर पोहचला असुन या आधी आम्ही प्रत्येकवेळी मीरा भार्इंदरला पाणी कपातीतुन वगळत नागरकिांना दिलासा दिला होता. पाणी कपात रद्द करा असे नाईक म्हणाले.
भुमिगत गटार योजनेच्या कामाचा खर्च ५०० कोटींच्या वर गेला असताना काम रखडले आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करा. उत्तन व परिसरातील रहिवाशी कचरा डंपींग मुळे त्रस्त असुन त्यांना दिलासा द्या. शहरात फेरीवाले व अनधिकृत बांधकामे वाढत असताना त्यावर नियंत्रण न ठेवणारया अधिकारयांवर कारवाई करा. टिडीआर घोटाळे, विकास आराखडा, पालिके कडुन केली जाणारी अनावश्यक व निकृष्ट दर्जाची बांधकामे , रखडलेले रस्ते, परिवहन सेवेची दुरावस्था आदी अनेक मुद्यांवर नाईक यांनी आयुक्तां कडे कारवाईची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री गेल्या दोन वर्षात शहरात सतत येत असुन विविध भुमपुजनं, उद्घाटनं करत आहेत. पण या कार्यक्रमांसाठी होणारा लाखो रुपयांचा खर्चाची कुठुन केला ? असा सावाल करत चौकशी करुन कारवाई करा असं निवेदनात म्हटलं आहे.
आयुक्तांनी या वेळी पाणी कपात रद्द करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उत्तन कचरा प्रकल्प सुरु करुन दुर्गंधी येणार नाही याची खबरदारी घेऊ तसेच निवेदनातील मागण्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं . काशिमीरा नाका येथील शिवाजी महाराजांचा पुतळा उंच करणं किंवा उड्डाण पुला पेक्षा उंच नविन पुतळा बसवण्यावर समिती विचार करत असल्याचे आयुक्तांनी सांगीतले.