शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

काशिमीरा येथील जंगलास लागलेल्या आगप्रकरणी वनविभागाने केला गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 4:20 PM

 सदर आग वन विभागाने आटोक्यात आणली. पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानसुद्धा मदतीसाठी धावून गेले.  

मीरा रोड - काशिमीराच्या माशाचा पाडालगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात रविवारी सायंकाळी मोठी आग लागली. सदर आग दोन भागात लागली असल्याचा संशय असून, वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. सुमारे अडीच तास आग धुमसत होती. सदर आग वन विभागाने आटोक्यात आणली. पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानसुद्धा मदतीसाठी धावून गेले.  

माशाचा पाडाजवळील जंगलात आग भडकल्याची माहिती स्थानिक आदिवासींनी रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास मनसेचे पदाधिकारी सचिन जांभळे यांना दिल्यानंतर ते आपले सहकारी अमित दाससह जंगलाजवळ पोहोचले. वनविभागाचा टोल फ्री क्रमांकावर प्रतिसाद मिळाला नाही, तर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी येण्यास त्यांना नकार मिळाला. अखेर सदर आग लागल्याची  माहिती  वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार व पालिका अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांना मिळाली. बोराडे यांनी लागलीच पालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक रवाना केले.  तर पवार यांनी वन विभागाची दोन पथके आग विझवण्यास रवाना केली. 

वनविभागाच्या पथकांनी  त्यांच्याकडील फायर ब्लोअरच्या सहाय्याने रात्री साडे नऊपर्यंत आग आटोक्यात आणली. सदर आगीमुळे पालापाचोळा, गवत व काही झाडे जळली असून, यात पक्षी व अन्य लहान वन्यजीवांची किती हानी झाली हे कळू शकलेले नाही. सदर आग दोन भागांत लागलेली असल्याने ती  लावण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे एक हेक्टर क्षेत्राचे आग लागल्याने नुकसान झाले आहे.  त्यामुळे वन विभागाने या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

 

गेल्या  वर्षी देखील या परिसरात अनेक वेळा आगी लागल्या होत्या . समाजकंटक येथे मद्यपान आदी करण्यासाठी जमतात . तसेच  या भागात भुमाफियांनी जंगलात तसेच जंगला लगत मोठय़ा प्रमाणात झोपड्या  उभारल्या आहेत. त्यावर ठोस कारवाईच होत नाही . शिवाय स्थानिक नगरसेवकांचा देखील वरदहस्त असतो . जंगल नष्ट करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप जांभळे यांनी केला आहे.