शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

थायलंडच्या तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या विदेशी दलाल महिलेस अटक; तीन पीडित तरुणींची सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: June 23, 2024 19:57 IST

यातील दलाल महिलेला २५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे : थायलंडच्या काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या विदेशी दलाल महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (एएचटीसी) अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी रविवारी दिली. यातील दलाल महिलेला २५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

वागळे इस्टेट भागातील लुईसवाडीत मुंबई-ठाणे पूर्व द्रूतगती महामार्गालगत सर्व्हिस रोडलगतच्या विटस् शरणम हॉटेलमध्ये काही विदेशी तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्याच आधारे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीसी कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्यासह जमादार श्रद्धा कदम, दीपक वालघुडे, धनंजय मोहिते, देवानंद चव्हाण, हवालदार किशोर पाटील, कॉन्स्टेबल पूनम खरात आणि किरण चांदेकर आदींच्या पथकाने २१ जून २०२४ रोजी सायंकाळी ४:१५ वाजता धाड टाकली. एका बोगस गिऱ्हाईकाच्या मदतीने विदेशी तरुणींची मागणी केली. त्यावेळी दलाल विदेशी महिलेने त्याठिकाणी थायलंडच्या तीन मुलींना आणले.

एका मुलीसाठी २५ हजारांचा सौदाही दलाल महिलेने यावेळी ठरविला. या मुलींच्या सौद्यानंतर बनावट गिऱ्हाईकाने इशारा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने याठिकाणी सापळा लावून थायलंडच्या दलाल महिलेस अटक केली. तिच्या तावडीतून ३० ते ३५ वयाेगटातील थायलंडच्या तीन पीडित महिलांची सुटका केली. दलाल आरोपी महिलेविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात कलम अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला बाल सुधारगृहातबळीत महिलांना मुंबईतील रेस्कू फाउंडेशन या महिला बाल सुधारगृहात ठेवले आहे. या महिला मुंबईतील जुहू भागात वास्तव्याला आहेत. त्यांनी मुंबईत कोणाकडे आश्रय घेतला होता? ठाण्यात त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? त्यांना या कामासाठी विदेशातून मुंबई, ठाण्यात कोणी आणले? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे गुन्हे शाखेच्या एचचटीसी विभागाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटsex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिस