रिक्षाने जाणाऱ्या महिलेच्या मोबाईलची जबरी चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 00:23 IST2021-08-12T00:20:12+5:302021-08-12T00:23:22+5:30
रिक्षाने जाणाºया एका ३५ वर्षीय महिलेच्या मोबाईलची दोघांनी जबरी चोरी करुन मोटारसायकलीवरुन पलायन केल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

मुंबई नाशिक द्रूतगती मार्गावरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: घोडबंदर रोड मार्गावरुन रिक्षाने जाणाºया एका ३५ वर्षीय महिलेच्या मोबाईलची दोघांनी जबरी चोरी करुन मोटारसायकलीवरुन पलायन केल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरुन ही महिला १० आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हिरानंदानी इस्टेट येथील आपल्या घरी रिक्षाने जात होती. त्याचवेळी नितीन ओव्हर ब्रिज येथे दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तिच्या हातातील ४० हजारांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. सहायक पोलीस निरीक्षक लामखडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.