बुलेट ट्रेनमुळे उड्डाणपूल रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:35 AM2018-09-01T03:35:31+5:302018-09-01T03:36:35+5:30

विटावा-ठाणे खाडीपुलावरून जुंपली : शिवसेना, राष्टÑवादीत श्रेयवाद

 The flyover stopped due to a bullet train | बुलेट ट्रेनमुळे उड्डाणपूल रखडले

बुलेट ट्रेनमुळे उड्डाणपूल रखडले

googlenewsNext

ठाणे : कळवा, खारेगाव येथील वाहतूककोंडीवर उतारा म्हणून विटावा ते ठाणे खाडीपुलाला निधी देण्यास एमएमआरडीएने मान्यता दिली. आयुक्त आर.ए. राजीव यांनी शुक्र वारी झालेल्या बैठकीत त्याचा ५० टक्के खर्च उचलण्यास होकार दिल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. उर्वरित ५० टक्के निधी ठाणे महापालिका खर्च करणार आहे. परंतु, या कामावरून शिवसेना विरुद्ध राष्टÑवादी असा सामना रंगला असून त्याची मागणीच मुळात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचा दावा करून विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी कुणी श्रेय घेऊ नये, असेही सुनावले.

ठाण्याशी संबंधित विविध प्रकल्पांसंदर्भात शिंदे यांनी एमएमआरडीएत राजीव यांची भेट घेतली. यावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, नगरअभियंता अनिल पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुंब्रा बायपास येथील वाय जंक्शन, शीळफाटा आणि कल्याणफाटा येथील उड्डाणपुलांची कामे तातडीने सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर, वाय जंक्शन येथील कामाला सुरु वात झाली आहे. परंतु, बुलेट ट्रेनमुळे शीळफाटा आणि कल्याणफाटा येथील उड्डाणपुलांचे आरेखन बदलावे लागणार आहे. कारण, बुलेट ट्रेनच्या मार्गावरून उड्डाणपूल नेणे अव्यवहार्य असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी अंडरपासच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत असल्याचे राजीव यांनी सांगितले. त्यावर, या अंडरपासचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवून एमएमआरडीएला पाठवण्याची सूचना महापालिकेला शिंदे यांनी केली.

कामे पूर्ण होताना श्रेय लाटू नका
च्विटावा-ठाणे रेल्वेला समांतर खाडीपूल, मुंब्रा अग्निशमन केंद्र ते काटईनाका डीपी रोड, कल्याण फाटा-शीळफाटा-वाय जंक्शन येथील उड्डाणपूल आदीवर चर्चा झाली. नवी मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना कळव्याला अनावश्यक वळसा घालावा लागतो. यामुळे येथे कोंडी होते.

च्उतारा म्हणून विटावा ते ठाणे स्थानक अशा रेल्वेला समांतर खाडीपुलाची मागणी केल्याचा दावा शिंदे यांनी केला. आत्माराम पाटील चौक ते कळवा आणि विटावा खाडीवरील समांतर खाडीपूल यासाठी आ. जितेंद्र्र आव्हाड यांनीच विधानसभेत आवाज उठवला होता. त्यामुळे आता याचे श्रेय कोणी घेऊ नये.

Web Title:  The flyover stopped due to a bullet train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.