शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा झेंडा, शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 18:30 IST

भाईंदर, दि. 21 - मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता राखली आहे. बहुमताचा आकडा पार करत भाजपने 61 जागांवर विक्रमी आघाडी ...

भाईंदर, दि. 21 - मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता राखली आहे. बहुमताचा आकडा पार करत भाजपने 61 जागांवर विक्रमी आघाडी घेतली आहे.  भाजपाच्या लाटेनं इतर पक्षांचा सुपडा साफ केला आहे.  शिवसेना 22, काँग्रेस 10 आणि इतरांना 2 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे.  

मीरा- भाईंदर महापालिकेच्या सर्व जागांवरील निकाल हाती आले आहेत.  हाती आलेल्या आकड्यांनुसार पुन्हा एकदा भाजपाचमीरा-भाईंदरमध्ये पालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर शिवसेनेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली असून तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेला यावर्षी चांगले यश मिळाले आहे. मागील निवडणुकीत शिवसेनाला 15 जागा मिळाल्या होत्या. यावेळी सत्तेचं स्वप्न जरी भंगलं असलं तरी सेनेच्या जागेत वाढ झाली आहे. अतिम निकाल हाती आला असून सेनेच्या वाट्याला 22 जागा मिळाल्या आहेत. 

गेल्या निवडणुकीत मिरा भाईंदर महापालिकेत राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर होती. राष्ट्रवादीकडे भाजपखालोखाल 27 जागा होत्या. पण यावेळी राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. एकही जागा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीची मोठा धक्का बसला आहे.  मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत काँग्रेसला 9 जागांच नुकसान झाले आहे.  गेल्यावर्षी काँग्रेसच्या  वाट्याला 19 जागा आल्या होत्या. मात्र, यावेळी काँग्रेसच्या 10 जागांवर समाधान मानावं लागले आहे.  शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेसच्या एका जागेवर बिनविरोध जिंकली. अल्पसंख्याक मतांवर मदार असलेल्या काँग्रेसला यावेळी मतदारांनी हात दाखवलाय.

मीरा भाईंदर महापालिकेच्या 2012च्या निवडणुकीत भाजपानंच सर्वाधिक 32 जागा मिळवल्या होत्या, मात्र त्याच वेळी काँग्रेसनं 18 आणि राष्ट्रवादीनं 26 जागा मिळवून अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन केली होती. पहिल्या अडीच वर्षात  काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, अपक्षांची सत्ता होती. मात्र त्यानंतर पुन्हा शिवसेना आणि भाजपानं सत्ता खेचून आणली होती. नंतरच्या अडीच वर्षात भाजपा, शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी बहुजन विकास आघाडी, अपक्षांची मोट बांधत सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसावे लागले होते. भाईंदर महापालिकेच्या 2012च्या महापालिका निवडणुकीत भाजपा 32, शिवसेना 15, काँग्रेस 18,  राष्ट्रवादी 26, बहुजन विकास आघाडी 3, एका अपक्षाचा विजय झाला होता. 

मिरा-भाईंदर महापालिका अंतिम निकाल असा आहे - 

भाजपा - 61

शिवसेना - 22

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 00

इतर - 02

एकणूण - 95

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक