फ्लेमिंगो पार्कच्या उभारणीत अतिक्र मण अन प्रदूषणाचे अडथळे

By Admin | Updated: August 10, 2015 23:12 IST2015-08-10T23:12:15+5:302015-08-10T23:12:15+5:30

ठाण्यात असणारी खाडी ही शहराची ओळख असली तरी बेकायदा बांधकामे, कचरा, सांडपाणी यामुळे ती गटार बनली आहे. यामुळे खाडीतील मासे तसेच इतर जीवजंतू नष्ट होऊ लागले आहेत.

Flamingo Parks have built-in barriers to pollution and pollution | फ्लेमिंगो पार्कच्या उभारणीत अतिक्र मण अन प्रदूषणाचे अडथळे

फ्लेमिंगो पार्कच्या उभारणीत अतिक्र मण अन प्रदूषणाचे अडथळे

ठाणे : ठाण्यात असणारी खाडी ही शहराची ओळख असली तरी बेकायदा बांधकामे, कचरा, सांडपाणी यामुळे ती गटार बनली आहे. यामुळे खाडीतील मासे तसेच इतर जीवजंतू नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे अस्तित्व टिकणे कठीण झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून या परिसराला फ्लेमिंगो पक्ष्यांचे अभयारण्य जाहीर करावे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
ठाणे खाडीत पूर्वी रेवू, कटला आदी प्रकारचे मासे मिळत होते. मात्र, प्रदूषणामुळे माशांची पैदास क मी झाल्याने खाडीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या फलेमिंगोंचीही उपासमार होत आहे.
राज्य शासनाच्या वन विभागात खारफुटी विभागाची स्थापना २०१२ मध्ये झाली. खारफुटी क्षेत्रामधील जवळपास १ हजार झोपड्यांचे अतिक्रमण हटविले असून मुंब्रा रेतीबंदर, मानखुर्दपासून वाशी रेतीबंदरपर्यंत असलेल्या खाडीला फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात येणार असून नियंत्रित पर्यटनाला परवानगी दिली जाणार आहे. मात्र, शहरीकरण व कारखानदारी वाढल्याने ठाणे खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ठाणे महानगरपालिकेतर्फे खाडीच्या प्रवाहात विविध ठिकाणच्या पाण्याच्या पातळीचे सर्वेक्षण केले.
या सर्वेक्षणानुसार अनधिकृत वस्तींमधून टाकण्यात येणारा कचरा तसेच खाडीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे त्याच्या खांबांजवळ बांधकामांचा कचरा टाकला जातो. त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. तसेच खाडी परिसरात वाढणाऱ्या झोपडीधारकांना राजकीय वरदहस्त असल्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे. हा भाग महसूल खात्याच्या हद्दीत येत असल्याने वन खात्याला येथील अतिक्रमणे हटविणे शक्य होणार नाही.

Web Title: Flamingo Parks have built-in barriers to pollution and pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.