शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पाच गावांत शिरले बारवी धरणाचे पाणी

By admin | Published: August 08, 2016 2:19 AM

गेल्या आठवड्यातील पावसाने बारवी धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने तोंडली, काचकोळी, जांभूळवाडी, मार्गवाडी, देववाडीतील प्रकल्पग्रस्तांच्या घरात पाणी शिरू लागले आहे

बदलापूर/मुरबाड : गेल्या आठवड्यातील पावसाने बारवी धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने तोंडली, काचकोळी, जांभूळवाडी, मार्गवाडी, देववाडीतील प्रकल्पग्रस्तांच्या घरात पाणी शिरू लागले आहे. त्यांना त्वरित घरे सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अनेक गावांतील पाणवठेही पाण्याखाली गेल्याने त्यांच्या स्थलांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, गावात पाणी शिरत असतानाही काही प्रकल्पग्रस्तांनी गाव न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आहे त्याच गावात उंचवट्याच्या ठिकाणी तात्पुरती निवारा शेड उभारून तेथे ते राहत आहेत. दोन दिवसांत पाण्याची पातळी आणखी वाढेल. सर्व आदिवासी पाडे पाण्याखाली जातील. त्यामुळे घरे सोडण्यावरून एमआयडीसी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.या ग्रामस्थांच्या स्थलांतरासाठी एमआयडीसीने मुरबाड शहरात आठ महिन्यांच्या भाडेकराराने ५० खोल्या घेतल्या आहेत. जी कुटुंबे स्थलांतरित होतील, त्यांच्या पाळीव जनावरांसाठी तंबू उभारून चाऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे. या गावांतील पाणवठे पाण्याखाली गेले आहेत. तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, मोबदल्याच्या मुद्द्यावरून काही गावकऱ्यांनी अद्याप घरे सोडलेली नाहीत. त्यामुळे त्यांना सक्तीने घरांतून बाहेर काढण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. प्रकल्पग्रस्त गावांतील चार घरे, विहिरी आणि बोअरवेल पाण्याखाली गेली आहे. या आदिवासीपाड्याला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. हे प्रकल्पग्रस्त जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जात आहेत. ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे, त्यांनी गाव न सोडता त्याच गावात वरच्या भागात तात्पुरती शेड बांधली आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बारवी प्रकल्पग्रस्त पीडित सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर भोईर यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. मात्र, या बैठकीत गाव न सोडण्याचाच निर्णय एकमताने घेण्यात आला. बुडित क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी पाण्याशी न खेळता आणि कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता त्वरित घरे सोडावी आणि स्थलांतर करावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे. या स्थलांतरितांची अवहेलना होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांच्या स्थलांतरापेक्षा बारवी प्रकल्पपीडितांच्या संघटनेच्या ‘वातानुकूलित’ पदाधिकाऱ्यांनी त्यांची माथी भडकावण्याचा प्रयत्न केल्याने कथोरे यांनी त्यांच्यावरही टीका केली. आजवरच्या आंदोलनात बाधित आदिवासी आणि आंदोलकांचा किती फायदा झाला आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. बारवी धरण आताच अस्तित्वात आलेले नाही. ज्याज्या वेळी त्याची उंची वाढवली, त्यात्या वेळी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मोबदल्याची मागणी मान्य केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पावसाळी अधिवेशनात बारवी प्रकल्पपीडित कुटुंबांच्या घरातील एकाला परिसरातील नगरपालिकांत कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी/वार्ताहर)